Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे हातात पुस्तक, खडू, डस्टर घेऊन शिक्षक होतात तेव्हा…
महाराष्ट्र संवाद विशेष

नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे हातात पुस्तक, खडू, डस्टर घेऊन शिक्षक होतात तेव्हा…

शिक्षक दिनी संगमनेरमध्ये तांबे झाले शिक्षक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/09/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना इंग्रजी व भूमिती विषय शिकविले

गुरुवार, दि. ०५ सप्टेंबर

संगमनेर – समाजाच्या विकासात शिक्षकांचा अत्यंत मोलाचा वाटा असून शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना अभिवादन करताना महाराष्ट्राचे युवा आमदार सत्यजित तांबे यांनी शाळेत जाऊन पुस्तक, खडू, डस्टरसह विद्यार्थ्यांना भूमिती व इंग्रजी हे विषय शिकवले.

सह्याद्री विद्यालय संगमनेर येथे आमदार सत्यजित तांबे यांनी इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी व भूमिती विषय शिकवले

आमदार सत्यजित तांबे यांनी इंग्रजी विषय शिकवताना इंग्रजीचे महत्त्व मोठे असून इंग्रजीला घाबरू नका असे सांगताना करियरसाठी हा विषय प्रत्येकाला आवश्यक आहे. मोठी स्वप्ने पहा त्याबरोबर चांगला अभ्यासही करा. दडपण न घेता हसत खेळत शिका म्हणजे शिक्षण सुद्धा आनंदाचे वाटेल असे सांगितले.

त्याचबरोबर सोशल मीडिया आणि मोबाईल हे पाहण्याचे आपले वय नाही. तर पुस्तके अभ्यासण्याचे हे वय आहे. इंग्रजी ही वाघिणीचे दूध आहे अशी आपली म्हण आहे. परंतु आता या दुधाची प्रत्येक विद्यार्थ्याला गरज आहे. इंग्रजी सोपी आहे तिचा बाऊ करू नका. इंग्रजीला न घाबरताना आत्मसात करा असा सल्ला दिला याचबरोबर विद्यार्थ्यांशी अनेक प्रश्न उत्तरेही केली.

तर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना भूमिती शिकवताना भूमिती हा जीवनाचा अविभाज्य भाग असून गोल, त्रिकोण, चौकोन हे आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाहत असतो. गणितामध्ये भूमिती महत्त्वाची आहेच परंतु जीवनामध्येही ती महत्त्वाची आहे.

जगाच्या पाठीवरील सौदी अरेबियामध्ये नव्याने द लाईट नावाचे शहर उभे राहत आहे. १७० किलोमीटर लांब आणि २०० किलोमीटर रुंद अशा या शहरातून जगात कुठेही सहा तासात आपण पोहोचू शकतो. या शहरांमध्ये एक कोटी नागरिक राहू शकतात असे हे शहर त्या ठिकाणी निर्माण होणार आहे.

महाराष्ट्रात १४ मैलावर भाषा बदलते, आपल्याकडे जेवणाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. राहणीमान वेगळे आहेत. महाराष्ट्रातच खानदेशी, मराठी, वऱ्हाडी, कोकणी अशा भाषा आहे .मात्र तरीही एकता ही आपली मोठी ताकद आहे असे सांगताना जशी आई आपल्या प्रत्येक मुलाला जीव लावते पालन पोषण करते तसेच प्रत्येक वडीलसुद्धा मुलाच्या भविष्यासाठी चिंतित असतात. म्हणून आई-वडील हे दोनही आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. याचबरोबर आई-वडिलानंतर जे आपल्याला घडवतात त्या शिक्षकांप्रतीही प्रत्येकाने कायम कृतज्ञ राहिले पाहिजे असा मौलिक सल्लाही दिला.

आमदार सत्यजित तांबे आज शिक्षक झाले हे पाहून सर्व विद्यार्थी भारावले. यानंतर सह्याद्री संस्थेचे सह सेक्रेटरी दत्तात्रय चासकर यांनी सह्याद्री संस्थेची माजी विद्यार्थी व विद्यमान आमदार सत्यजित तांबे यांचा सत्कार केला.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,335
शिक्षक दिन सत्यजित तांबे सह्याद्री विद्यालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.