Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माझी वसुंधरा अभियानात अहमदनगर जिल्ह्याला सहा राज्यस्तरीय पुरस्कार, विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी
प्रशासन

माझी वसुंधरा अभियानात अहमदनगर जिल्ह्याला सहा राज्यस्तरीय पुरस्कार, विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी

प्रधान सचिवांकडून जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/09/2024Updated:29/09/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, २९ सप्टेंबर

अहमदनगर – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने नाशिक विभागात माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत ४ नगर परिषदांनी व महानगरपालिकेने पुरस्कार मिळविल्याने पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्राद्वारे अभिनंदन केले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने भूमी, वायू, अग्नी, जल आणि आकाश या पाचही घटकात चांगली कामगिरी केली. घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, सौर ऊर्जेचा उपयोग, एलईडी दिव्यांचा उपयोग, वृक्षारोपण, वॉटर ऑडिट, जल प्रदूषण कमी करणे, नागरिकांचा स्वच्छतेत सहभाग, वायू प्रदूषण मुक्ती, जनजागृती आदी क्षेत्रात विविध उपक्रम राबविले.

नुकताच वसुंधरा अभियान ४.० चा निकाल जाहीर करण्यात आला. यात अहमदनगर महानगरपालिकेला राज्य स्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. महानगरपालिकेने सतत दुसऱ्या वर्षी पुरस्कार मिळविला आहे. अशी कामगिरी करणारी अहमदनगर महानगरपालिका राज्यात पहिली महापालिका आहे.

संगमनेर नगरपरिषदेने ५० हजार ते १ लक्ष लोकसंख्या गटात राज्यस्तर उत्तेजनार्थमध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे. २५ ते ५० हजार लोकसंख्या गटामध्ये विभागस्तरावर शिर्डी नगर परिषदेने प्रथम, तर देवळाली प्रवरा नगर परिषदेने तृतीय क्रमांक आणि राहाता नगर परिषदेने १५ ते २५ हजार लोकसंख्या गटात राज्यस्तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

जिल्हा परिषदेने उत्कृष्ट नियोजन केल्याने जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींना १६ पुरस्कार जाहीर झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी, कर्जत तालुक्यातील मिरजगांव, कोपरगाव तालुक्यातील संवत्सर, राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक, संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी, धांदरफळ बुद्रुक, खांडगाव, पेमगिरी, चिंचोली गुरव, लोहारे, चोरकौठे (देवकौठे) व तिगाव, शेवगाव तालुक्यातील वाघाली, आव्हाणे बुद्रुक, श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद, या ग्रामपंचायतींना राज्य आणि विभाग स्तरावर विविध गटात पुरस्कार जाहीर झाले आहेत.

पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींनी भुमी, वायू, अग्नी, जल व आकाश या घटकात शासनाच्या मार्गदर्शक निर्देशानुसार उपाययोजना केल्या आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 481
पुरस्कार माझी वसुंधरा अभियान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

संगमनेर येथे ३० ऑगस्टला ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ सोहळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह २० शिक्षकांचा होणार सन्मान

23/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

By Annant Ppangarkar18/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा आणि छुप्या मार्गाने होणाऱ्या…

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.