सोमवार, ३० सप्टेंबर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षात घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संगमनेरमध्ये मंगळवारी (१ ऑक्टोंबर) आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस शहर व तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संगमनेर शहराध्यक्ष कैलास कासार यांनी केले आहे.
पडताणी कॉम्प्लेक्समध्ये दुपारी साडेबारा वाजता ही बैठक होत असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर मतदार संघात या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा केली जाणार आहे. संगमनेर तालुका अध्यक्ष आशिष शेळके, तालुका कार्याध्यक्ष विजूभाऊ खरात, शहराध्यक्ष कैलास कासार आदी पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होत आहे.
बैठकीसाठी युवक अध्यक्ष योगेश मंतोडे, मधुकर सोनवणे, बाळासाहेब कदम, जनार्दन साळवे, सुनील सोनवणे, अशोक सोनवणे, रवी रुपवते, रमेश भोसले, सागर शिंदे, संपत भोसले, सिद्धार्थ भोसले, भरत भोसले, गौतम वर्पे, नाना कदम, सिद्धार्थ खरात, शहानवाज बेगमपुरे, रुपेश राऊत, योहान मिसाळ, प्रकाश वाघमारे, शरद जमदाडे, आत्माराम अडांगळे, विजय अडांगळे, दीपक खरात, दिनकर शिंदे, लक्ष्मण मेढे, शरद तपासे गोविंद सोनवणे, अविनाश सोनवणे, दीपक अडांगळे, राजू वाघमारे, दीपक खरात, शशिकांत रोकडे, विकास गायकवाड, नाना जगताप, अनिकेत खरात आदी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार असून शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.