मंगळवार, ०१ आक्टोंबर
इलेक्ट्रिक स्कुटीच्या डीक्कीमध्ये ठेवलेले दोन लाख रुपये लांबविण्याचा प्रकार सोमवारी दुपारी संगमनेरमध्ये समोर आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील वर्दळीच्या लिंक रोड रस्त्यावर घडलेल्या या घटने संदर्भात अधिक माहिती अशी, जेधे कॉलनी येथील आकाश कैलास जेधे या तरुणाने यासंदर्भात मंगळवारी (०१ आक्टोंबर) संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी (३० सप्टेंबर) दुपारी एक ते सव्वा वाजण्याच्या दरम्यान शहरातील नवीन नगर रस्त्यालगतच्या लिंक रोड येथे असलेल्या एचडीएफसी बँकेबाहेर इलेक्ट्रिक स्कुटीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले दोन लाख रुपये अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेले आहे.
या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार कानिफनाथ जाधव करत आहे.