Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निझर्णेश्वर मंदिर देवस्थान होणार संगमनेर तालुक्यातील प्रमुख पर्यटन केंद्र; पालकमंत्री विखे
धार्मिक

निझर्णेश्वर मंदिर देवस्थान होणार संगमनेर तालुक्यातील प्रमुख पर्यटन केंद्र; पालकमंत्री विखे

आमदार अमोल खताळ म्हणाले की, राज्य शासनाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात विविध विकासकामांसाठी विक्रमी निधी प्राप्त होत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

श्रीक्षेत्र निझर्णेश्वर मंदिराचा सुरू झालेला भव्य जीर्णोद्धार आणि वनविभागाच्या जागेवर प्रस्तावित असलेला बिबट सफारी प्रकल्प यामुळे हे देवस्थान आगामी काळात संगमनेर तालुक्यातील एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

श्रीक्षेत्र निझर्णेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ नुकताच पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार अमोल खताळ, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे, वनविभागाचे अधिकारी अमरजित पवार, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, कैलास तांबे यांच्यासह मंदिर विश्वस्त समितीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले की, मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. मात्र, या पवित्र कामात लोकसहभाग असणेही तितकेच गरजेचे आहे. आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या विकास निधीमुळे या परिसराचा कायापालट झाला असून, जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्यावर या तीर्थक्षेत्राची भव्यता आणि पावित्र्य अधिक वृद्धिंगत होईल. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

राजस्थानमधील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पांच्या धर्तीवर या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे निझर्णेश्वर परिसरात पर्यटकांचा ओघ वाढणार असून, त्यातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नवीन आणि मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. हा प्रकल्प तालुक्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आमदार अमोल खताळ म्हणाले की, राज्य शासनाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात विविध विकासकामांसाठी विक्रमी निधी प्राप्त होत आहे. पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास होत असून, यामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी गती मिळत आहे. निझर्णेश्वर देवस्थानचा हा परिसर भविष्यात जिल्ह्याचे एक महत्त्वाचे विकास केंद्र म्हणून ओळखले जाईल. या कार्यक्रमामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 636
अमोल खताळ देवस्थान धार्मिक राधाकृष्ण विखे पाटील विकास
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.