Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मोजणी रिपोर्ट, नकाशा न्यायालयात सादर करण्यासाठी २५ ते ३० हजार रुपये लागतील… मग घडले असे काही
गुन्हेगारी

मोजणी रिपोर्ट, नकाशा न्यायालयात सादर करण्यासाठी २५ ते ३० हजार रुपये लागतील… मग घडले असे काही

हजारोत पगार तरीही वरकमाईचा मोह आवरेना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/10/2024Updated:03/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

लाचेचा पहिला हप्ता घेताना नगर जिल्ह्यात भूमी अभिलेखच्या निमतानदारास रंगेहाथ पकडले 

गुरुवार, ०३ ऑक्टोंबर

अहमदनगर – क्षेत्राच्या झालेल्या मोजणीबाबत व मोजणीचा रिपोर्ट, नकाशा न्यायालयात सादर करण्यासाठी तक्रारदाराकडे लाच मागणारा पाथर्डीच्या उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील लाचखोर निमतानदारास लाचेचा पहिला हप्ता घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.

अहमदनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून संजय भीमराव मनवरे (वय ५६ वर्ष,रा. भगवाननगर, पाथर्डी, ता. पाथर्डी जि. अहमदनगर) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या नावे असलेल्या मौजे कासार पिंपळगाव ता. पाथर्डी, जि. अहमदनगर येथील क्षेत्राच्या झालेल्या मोजणीबाबत व मोजणीचा रिपोर्ट व नकाशा न्यायालयात सादर करणेकरीता आरोपी लोकसेवक मनवरे यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती.

त्यानंतर तक्रारदाराने या संदर्भात अहमदनगरच्या लाच लुचपत विभागाशी संपर्क करत तक्रार नोंदवली. लाच लुचपत विभागाने तक्रारीच्या अनुषंगाने दि. १८ सप्टेंबरला लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान मनवरे यांनी पंचासमक्ष २५-३० हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाच रकमेचा पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर लाचखोर मनवरे यास पकडण्यासाठी गुरुवारी (३ ऑक्टोंबर) उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अंमलदार चंद्रकांत काळे, उमेश मोरे, बाबासाहेब कराड, रवींद्र निमसे, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल दशरथ लाड यांनी सापळा लावला.

तक्रारदाराकडून दहा हजार रुपये लाच स्वीकारताना मनवरे याला पकडण्यात आले असून त्याच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाच लुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक अजित त्रिपुटे करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,246
भूमी अभिलेख लाच लुचपत लाचखोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.