Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बस स्थानकातून पुन्हा महिलेचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबवले… दागिने चोरीचे मालिका सुरूच!
गुन्हेगारी

बस स्थानकातून पुन्हा महिलेचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबवले… दागिने चोरीचे मालिका सुरूच!

चैन स्नॅचिंगचे गुन्हे रोखण्याचे नव्या पोलीस निरीक्षकांसमोर आव्हान
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 7, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, ०७ ऑक्टोबर 

असुरक्षित बनलेल्या संगमनेरमध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविण्याची मालिका नव्या पोलीस निरीक्षकांच्या कार्यकाळात अद्यापही सुरूच आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी महिलेच्या गळ्यातील दागिने लांबविल्यानंतर शनिवारीदेखील एसटी बसमध्ये चढत असताना महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड लाखाचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे.

त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात दागिने घालून घराबाहेर पडणाऱ्या महिला असुरक्षित बनल्या असून दागिने चोरांना लगाम घालण्यात संगमनेर शहर पोलीस यशस्वी होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात दिवसा आणि रात्री पोलिसांनी गस्त वाढविण्याची, सतर्क राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

निर्मला जयराम आंबरे (वय ७१ वर्ष रा. शिवाजी चौक, अकोले, ता. अकोले जि. अहमदनगर) या वृद्ध महिलेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरात्र उत्सव काळातील हा दुसरा प्रकार समोर आला आहे.

निर्मला आंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी (५ ऑक्टोंबर) त्या राजापूर (संगमनेर) येथे चुलत भावाच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. कार्यक्रम आटोपल्यानंतर घरी परतण्यापूर्वी त्यांनी आपल्या गळ्यातील सुनेच्या मालकीचे असलेले सोन्याचे गंठण आपल्या जवळील पर्समध्ये ठेवले होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्या अकोले येथे जाण्यासाठी त्या बस स्थानकावर आल्या असता त्यांनी पर्सची तपासणी केली त्यावेळी पर्समध्ये सोन्याचे गंठण होते.

त्यानंतर संगमनेर बस स्थानकात एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांना धक्का दिला. बसमध्ये चढल्यानंतर त्यांनी तिकीट काढण्यासाठी पर्स उचकून बघितली असता त्यांच्या पर्समधील सात तोळे सोन्याचे मिनी गंठण आणि चारशे रुपयांची रोकड असा ऐवज चोरून नेला असल्याचे त्यांना आढळून आले. दागिने आणि रोकड लंपास केल्याचा प्रकार लक्षात येतात आंबरे यांनी आरडाओरड केली मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही. तोपर्यंत चोरटे दागिने घेऊन पसार झाले होते.

दरम्यान या प्रकारामुळे घाबरलेल्या आंबरे यांनी घर गाठत झालेला प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर रविवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली. पोलीस हवालदार गणेश सोनवणे या संदर्भात पुढील तपास करत आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,389
चैन स्नॅचिंग संगमनेर बस स्थानक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

पाच कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह सात जणांना अटक

June 8, 2026

राजूर ‘फेक मर्डर केस’ : दोन पोलीस निरीक्षक निलंबित, DGP सदानंद दाते आढावा बैठक घेण्याची शक्यता

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

By अनंत पांगारकरJune 10, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज | अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जुने भालगाव येथे नदीच्या पाण्यात बुडून…

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.