मंगळवार, ०८ ऑक्टोंबर
सोलापूरमध्ये मंगळवारी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अनुक्रमे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा पार पडला.


यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महिलांना या योजनेचा लाभ मिळत असल्याने समाधान व आनंद वाटतो. ही योजना पुढील पाच वर्षे शासन सुरु ठेवेल. राज्यातील सर्व उपसा योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येणार असून यासाठी ३ हजार ३६६ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पंपासाठी दिवसा वीज देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्य शासन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय ठरली आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम असल्याने पुढील काळातही योजना अशीच चालू राहील. विज बिल माफी योजनेमुळे राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना १५ हजार कोटींची वीज बिल माफी देण्यात आली आहे.



