Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर जिल्ह्यात मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी, १२ केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू
शेती व सहकार

अहिल्यानगर जिल्ह्यात मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी, १२ केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू

शेतकऱ्यांना माल खरेदी केंद्रावर घेऊन येणे बंधनकारक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, १० ऑक्टोंबर

अहिल्यानगर – आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी पणन महासंघाने मूग, उडिद व सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजूरी दिली. याशिवाय मूग, उडिद व सोयाबीन हमीभावाने खरेदीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या असून जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी बी. आर. पाटील यांनी दिली.

हंगाम २०२४-२५ साठी मूग या पिकासाठी हमीभाव ८ हजार ६८२ प्रति क्विंटल, उडिद ७ हजार ४०० प्रति क्विंटल तर सोयाबीनसाठी ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. मूग व उडिद पीकाची १० ऑक्टोबर २०२४ ते ७ जानेवारी २०२५ तर सोयाबीन पिकाची १५ ऑक्टोबर २०२४ ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत या केंद्रावरुन खरेदी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या १८ केंद्रापैकी खालील १२ केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.

शेवगाव तालुक्यामध्ये सुखायू फार्मर प्रोड्युसर कंपनी बोधेगाव व नाथ ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी हातगाव, पाथर्डी तालुक्यात जय भगवान स्वयंरोजगार सहकारी संस्था मार्केट यार्ड पाथर्डी, जामखेड तालुक्यात कृषि उत्पन्न बाजार समिती जामखेड, कर्जत तालुक्यात कर्जतकर फार्मर प्रोड्युसर कंपनी बर्गेवाडीरोड कर्जत, श्रीगोंदा तालुक्यात शिवदत्त फार्मर प्रोड्युसर कंपनी घारगाव, रिअल ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी घुटेवाडी, जय किसान फार्मर प्रोड्युसर कंपनी मांडवगण, राहुरी तालुक्यात राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ राहुरी, पारनेर तालुक्यात कृषि उत्पन्न बाजार समिती पारनेर, राहाता तालुक्यात कृषि उत्पन्न बाजार समिती राहाता, तर कोपरगाव तालुक्यामध्ये कृषि उत्पन्न बाजार समिती कोपरगाव येथे खरेदी करण्यात येईल.

सर्व खरेदी प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आधारकार्डची राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असलेले पासबुकची छायांकित प्रत, चालू वर्षाचा ८-अ व ७/१२ उतारा आणि मूग, उडिद व सोयाबीन पिकाची नोंद असलेला ऑनलाईन पीकपेरा व चालू मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी एफएक्यू दर्जाचा म्हणजेच काहीही कचरा नसलेला चाळणी करुन सुकवून माल केंद्रावर आणावा. नाफेडच्या एनसीसीएफच्या स्पेसीफिकेशननुसार शेतमालाची तपासणी करण्यात येईल. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार एसएमएस देऊन खरेदीसाठी बोलावण्यात येईल. देण्यात आलेल्या तारखेसच शेतकऱ्यांना माल खरेदी केंद्रावर घेऊन येणे बंधनकारक राहील, असेही कळविण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 808
उडीद खरेदी केंद्र मुग सोयाबीन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.