Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी मंत्री भाजप नेते मधुकरराव पिचड सुनेच्या तक्रारीमुळे अडचणीत, पत्नीच्या नावे बोगस आदिवासी दाखले मिळवत सुनेचे पाच कोटी रुपये हडपले… प्रकरण पोहोचले न्यायालयात
गुन्हेगारी

माजी मंत्री भाजप नेते मधुकरराव पिचड सुनेच्या तक्रारीमुळे अडचणीत, पत्नीच्या नावे बोगस आदिवासी दाखले मिळवत सुनेचे पाच कोटी रुपये हडपले… प्रकरण पोहोचले न्यायालयात

सुनावणी २५ ऑक्टोंबरला होणार
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 10, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, १० ऑक्टोबर 

पुणे – सुनेने न्यायालयात केलेल्या फसवणूक आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीमुळे आणि न्यायालयाने काढलेल्या नोटीसीमुळे राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते मधुकरराव पिचड, पत्नी कमल आणि संबंधितांच्या यांच्या अडचणीत आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढ झाली आहे.

पिचड यांनी त्यांच्या द्वितीय पत्नी कमल या आदिवासी नसतांना त्यांचा खोटा व बनावट आदिवासी जातीचा दाखला बनून त्याआधारे आमच्या सून श्रीमती सरोज जितेंद्र पिचड यांची संपत्ती हडप करून फसवणूक केली असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात श्रीमती पिचड यांनी अनुसूचित जाती जमाती तपासणी समितीचे सह आयुक्त यांच्याकडे २०१८ पासून तसेच शहापूर पोलीस निरीक्षक यांच्याकडे देखील तक्रारी केल्या मात्र राजकीय दबावातून या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.

या संदर्भात ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पिचड यांची दुसरी पत्नी कमल पिचड या हिंदू मराठा असताना मधुकर पिचड यांनी बनावट कागदपत्रे तयार करून घेतली. त्याचवेळी सून श्रीमती सरोज जितेंद्र पिचड यांच्या बळजबरीने अनेक कागदपत्रांवर सह्या आणि स्वतःच्या ओळखीचा फायदा घेऊन सरकारी रेकॉर्डमध्ये फेरफार करून घेत जमिनी कमल यांच्या नावे करून घेतल्या.

ठाणे आणि नगर जिल्ह्यात असलेल्या या सर्व जमीन मिळकती त्यांनी समृद्धी महामार्गात विक्री करून त्याद्वारे शासनाकडून साधारणतः पाच करोड रुपये घेतले. या जमिनीचा मोबदला वास्तविकता सून सरोज यांना मिळणे अपेक्षित होते. तसेच पिचड यांनी अन्य शेतकऱ्यांच्या देखील मिळतात अशाच प्रकारे बेकायदेशीर बळकावून त्यातून करोडो रुपये मिळवले.

याबाबत २०१८ पासून सहआयुक्त अनुसूचित जाती जमाती तपासणी समितीकडे तक्रारी केल्या आहे मात्र सरकारी अधिकारी पिचड यांच्या दबावाखाली वागतात. त्यामुळे या संदर्भात सरोज पिचड यांनी शहापूरच्या पोलीस निरीक्षकांकडे रीतसर तक्रार देखील केली मात्र या तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी कल्याणच्या जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत न्यायालयाने मधुकर पिचड, कमल पिचड आणि संबंधितांवर कारवाई का केली जाऊ नये यासंबंधी नोटीस काढली असून पुढील सुनावणी २५ ऑक्टोंबरला होणार आहे.

अश्या प्रकारे कमल पिचड यांनी आदिवासी नसताना आदिवासी जमिनी बेकायदेशीर बळकवून त्यातून करोडो रुपयांचा नफा मिळविला. त्यास मधुकर पिचड यांचे राजकीय पाठबळ असून ते सध्या सत्ताधारी भाजपमध्ये असल्याने त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नाही. याप्रकरणी न्याय मिळेल याची खात्री नसल्याने सरोज पिचड यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

सरोज पिचड यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यासह अन्य लोकांविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार देखील खटला दाखल केला असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी न्यायालयात माजी मंत्री पिचड काय म्हणणे मांडतात याकडे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,306
कल्याण जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय कौटुंबिक छळ फसवणूक मधुकर पिचड शहापूर सरोज पिचड
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

पाच कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह सात जणांना अटक

June 8, 2026

राजूर ‘फेक मर्डर केस’ : दोन पोलीस निरीक्षक निलंबित, DGP सदानंद दाते आढावा बैठक घेण्याची शक्यता

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJune 10, 20260

आजचे राशीभविष्य ​मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामगिरीचे…

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.