Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ना युती ना आघाडी, स्वतंत्रपणे लढणार… निवडणूक निकालानंतर मनसे हा सत्तेतील पक्ष असेल – राज ठाकरे
राजकारण

ना युती ना आघाडी, स्वतंत्रपणे लढणार… निवडणूक निकालानंतर मनसे हा सत्तेतील पक्ष असेल – राज ठाकरे

सर्वच पक्षांवर जोरदार टीका, राज्याची धुरा महाराष्ट्राने एकदा आमच्या हातात द्यावी एवढीच विनंती करतो...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, १३ ऑक्टोंबर
जे मनाला येईल ते सांगितले जाते. शब्द दिले जात आहे. फुकट पैसे दिले जात आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष पैसे वाटतील. कारण ते तुमचेच पैसे आहे. इथूनच लुटलेले पैसे आहेत, ते पैसे नक्की घ्या, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मते द्या. महाराष्ट्राची धुरा माझ्या हातात आली की हा महाराष्ट्र दिल्लीसमोर झूकणार नाही आणि तुटणार नाही. आपला अभिमान, स्वाभिमान आपणच जगावला पाहिजे. निवडणुकीनंतर मनसे हा सत्तेतील पक्ष असेल असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वच विरोधी पक्षांवर टीका केली आहे.रविवारी ठाकरे गोरेगाव येथे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले.
ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्रपणे लढणार असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे राज्यात आता तिरंगी अथवा त्यापेक्षा जास्त उमेदवारांमध्ये लढती होण्याची चिन्हे आहे.
ठाकरे विविध विषयावर भाष्य करताना म्हणाले, सुसंस्कृत महाराष्ट्र. देशाला दिशा देणारा महाराष्ट्र म्हणायचा. आज या महाराष्ट्राची ही दिशा? याला दशा म्हणतात. राजकीय पुढारी लोक निवडणुकीच्या तोंडावर काय वाटेल ते करतील. तुम्हाला जातीमध्ये बुडवतील. अजून कोणत्या गोष्टीत अडकवतील, पैशाचा महापूर आणतील. तुम्ही हे पैसे घ्या आणि मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला द्या.
सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, येत्या काही दिवसात आचारसंहिता लागेल. महाराष्ट्राकडे तुमचे, प्रत्येक मनसैनिकाचं लक्ष असलच पाहिजे. कुठे काय घडतय जनतेला कशाप्रकारे फसवलं जाते ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे.
त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत ना युती, ना आघाडी आपण स्वतंत्रपणे राज्यात निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. निवडणूक निकालानंतर मनसे हा सत्तेतील पक्ष असेल हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ज्या लोकांनी अपेक्षा ठेवले आहे त्यांना आपण उत्तम महाराष्ट्र घडवून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तुम्हाला गृहीत धरलय. माझ्या हातात सत्ता द्या प्रत्येकाच्या हाताला काम असेल पण ते जातीप्रमाणे दिले जाणार नाही. मराठा समाजाला हव असलेले आरक्षण मिळू शकत नाही. ही गोष्ट होऊ शकत नाही. हे प्रत्येकाला माहित आहे. फक्त खरं बोलण्याचा धाडस राज ठाकरे करतो असे देखील स्पष्टपणे म्हणाले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरूनही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. तुम्हाला आज लिहून देतो, लाडकी बहीण योजनेचे या महिन्याचे पैसे येतील. पुढच्या महिन्याचे येतील. नंतर पैसे येणार नाही. जानेवारी, फेब्रुवारीत राज्याकडे पगार द्यायला पैसे नसतील.
राज्यात योजना काढून फुकट कसले पैसे देताय? बेरोजगारांना फुकट पैसे, शेतकऱ्यांना फुकट वीज, शेतकरी कुठे मागतोय, तो म्हणतो विजेत सातत्य असू द्या, कमी पैशात द्या. राज्यात कोणी काही मागत नाही यांना फुकट द्यायच्या सवयी लावायच्या आहेत. एकदा सवय लावली तर इतर राजकीय पक्ष तेच करतील. राज्य म्हणून काय विचार करणार आहात की नाही असा थेट सवालही त्यांनी केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 565
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मेळावा राज ठाकरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.