Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

मंगळवार, ०६ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

06/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रवरेत बोट उलटून मृत्यू झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना अखेर ४४.६८ लाखाची नुकसान भरपाई मंजूर
महाराष्ट्र संवाद विशेष

प्रवरेत बोट उलटून मृत्यू झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना अखेर ४४.६८ लाखाची नुकसान भरपाई मंजूर

सुगाव बुद्रुक येथे ही दुर्घटना घडली होती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, १५ ऑक्टोंबर
प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. नदीपात्रात या मुलांचा शोध व बचाव सुरू असताना सुगाव बुद्रुक (अकोले) येथे शोध कार्य करणाऱ्या पथकाची बोट उलटून तीन पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने नुकसान भरपाई व अन्य लाभ म्हणून गृह विभागाने ४४.६८ लाखाची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. यासंबंधीचे आदेश नुकतेच काढण्यात आले.

२३ मे २०२४ रोजी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे ही दुर्घटना घडली होती. पाण्याचा प्रवाहात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. या बुडून मृत्यू झालेल्या मुलांपैकी एकाच्या शोधासाठी बचाव पथकाची मदत घेण्यात आली. बचाव कार्य सुरू असताना नदीपात्रातील तीव्र प्रवाहाच्या पाण्याच्या भोवऱ्यात अडकून बचाव कार्याची बोट उलटली. या घटनेत स्थानिक नागरिकासह पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या एका व पोलीस शिपाई दर्जाच्या दोघा अधिकारी कर्मचाऱ्यांचा नदीपात्रातील भोवऱ्यात सापडल्याने बुडून मृत्यू झाला होता.
पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे (राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ५, दौंड), पोलीस शिपाई वैभव सुनील वाघ (राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ६, धुळे) आणि पोलीस शिपाई राहुल गोपीचंद पावरा (राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ८, नवी मुंबई) अशी शहीद झालेल्या आपत्ती व्यवस्थापनातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे होती.
शासनाने यांना नुकसान भरपाई मंजूर केली असून शासनाच्या आदेशानुसार दिवंगत उपनिरीक्षक प्रकाश शिंदे यांना १७,९६,०००/-, पोलीस शिपाई वैभव वाघ यांना १३,३६,०००/- व पोलीस शिपाई राहुल पावरा यांच्या कुटुंबीयांना १३,३६,०००/- रुपयांची नुकसान भरपाईची शासनाने जाहीर केलेली मदत मिळणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,589
आपत्ती व्यवस्थापन पोलीस मदत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

आमदार अमोल खताळ शेतकऱ्यांच्या बांधावर; पिकांसंदर्भात अधिकाऱ्यांना या सूचना

01/10/2026

फडणवीसांना थेट ललकारलं! ३ महिने जेलमध्ये टाकलं तरी पुन्हा येईन; ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात एल्गार, दादरमध्ये उद्या ठिय्या

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- उडीसा आणि आसाम या राज्यांतून पुण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी…

मंगळवार, ०६ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

06/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.