Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निवडणुकीसाठी आवश्यक परवानग्यासाठी राजकीय पक्षांकरिता सुविधा कक्ष, यासाठी घ्यावी लागेल परवानगी – जिल्हाधिकारी सालीमठ
निवडणूक

निवडणुकीसाठी आवश्यक परवानग्यासाठी राजकीय पक्षांकरिता सुविधा कक्ष, यासाठी घ्यावी लागेल परवानगी – जिल्हाधिकारी सालीमठ

सोशल मीडियावरही करता येतील जाहिराती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, १६ ऑक्टोंबर

अहिल्यानगर – विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांना आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्या विहित वेळेत मिळाव्यात यासाठी सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे.

प्रचार फेरी, जाहीर सभा, चौक सभा यासह सर्व प्रकारच्या सभा, तहसिल अंतर्गत सभा व रॅलीची परवानगी संबंधित पोलीस निरीक्षक यांच्याकडून प्राप्त होणार आहे. परवानगीसाठी अर्ज व डी-१ नमून्यात अतिरिक्त माहिती, नगरपालिका/महानगरपालिकेचे जाहिरात लावण्याचे शुल्क व नाहरकत दाखला तसेच अनूसूची १६ आवश्यक आहे.

सभेच्या ठिकाणी पोस्टर्स, झेंडे, कापडी बॅनर्स लावण्यासाठी महानगरपालिका, नगर परिषद, नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्याकडून परवानगी देण्यात येणार आहे. परवानगीसाठीच्या अर्जासोबत खाजगी जागा असल्यास मालकाचे संमतीपत्र व महानगरपालिका, नगरपालिकेची जागा असल्यास परवानगी शुल्क भरल्याचा पुरावा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

खाजगी जागेतील जाहिरात फलकावर प्रचार साहित्य लावण्याची परवानगी महानगरपालिका, नगर परिषद, नगरपालिका व ग्रामपंचायत कार्यालयाकडून देण्यात येणार आहे. यासाठी अर्जासोबत मालकाचे संमतीपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा परवान शुल्क भरल्याचा पुरावा तसेच पोलीस ना हरकत दाखला जोडणे आवश्यक आहे.

विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात (पांढरा रंग) प्रचार वाहनाची परवानगी संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज, आर.सी. बुक, वाहनाचा इन्शुरन्स असल्याचा पुरावा, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची परवानगी, पोलीसांकडील नाहरकत दाखला, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र, टॅक्स भरल्याची पावती, व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, चालकाचा परवाना, पीयूसी तसेच वाहनाच्या चारही बाजूचा फोटो आवश्यक आहे.

उमेदवाराच्या तात्पुरत्या प्रचार कार्यालयाची परवानगी संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून देण्यात येणार आहे. यासाठी करावयाच्या अर्जासोबत खाजगी जागा असल्यास जागा मालकाचे संमतीपत्र, स्थानिक स्वराज्य संस्था जागा परवाना शुल्क तसेच पोलीसांचा ना हरकत दाखला आवश्यक आहे.

हेलिपॅड व हेलिकॉप्टर उतरविण्यासाठीची परवानगी अपर जिल्हादंडाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडून देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करतांना पोलीस अधीक्षक, महानगरपालिका/नगरपालिका/ ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच रुग्णवाहिकेबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

सभेसाठी ध्वनिक्षेपकाची परवानगी पोलीस विभाग, तर वाहनासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यावर पोलीस निरीक्षक परवानगी देतील. यासाठी अर्जासोबत वाहनांसाठीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.

शाळेच्या मैदानावर सभा घेण्यासाठीची परवानगी उपविभागीय दंडाधिकारी यांच्यामार्फत देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज, शाळा व्यवस्थापन, शिक्षणाधिकारी, स्थानिक प्राधिकरण, आणि पोलीसांच्या नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.

सोशल मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, प्रिंट मिडियावर प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती, बल्क एसएमएससाठी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज व दोन प्रतीत जाहिरातीची संहिता तसेच निर्मिती (दोन प्रतीत पेन ड्राईव्ह किंवा सीडीमध्ये) जिल्हास्तरीय समितीकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षात सादर करावा, असे जिल्हा निवडणूक शाखेने कळविले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 523
निवडणूक आचारसंहिता परवानगी सिद्धाराम सालीमठ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

25/05/2026

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला, आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा विजय

04/05/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar21/09/20260

मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे चीज होईल आणि…

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.