Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अकरा हजाराची लाच घेणारे दोघे अधिकारी अटकेत, १८ शिक्षकांची करून देणार होते वेतन पडताळणी
गुन्हेगारी

अकरा हजाराची लाच घेणारे दोघे अधिकारी अटकेत, १८ शिक्षकांची करून देणार होते वेतन पडताळणी

नासिक लाच लुचपतची कारवाई
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 18, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, १८ ऑक्टोबर 

नाशिक – १८ शिक्षकांची वेतन पडताळणी करून त्याची नोंद सेवा पुस्तकात करण्याकरिता प्रत्येकी सातशे रुपये प्रमाणे लाचेची मागणी करून तडजोडीअंती ११ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील दोघा अधिकाऱ्यांना लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

किरण रंगनाथ दराडे (वय ४० वर्ष, कनिष्ठ लेखाधिकारी, वित्त विभाग) व सचिन प्रभाकर पाटील (वय ४० वर्ष, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) वित्त विभाग) असे जिल्हा परिषदेतील दोघा लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.

लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणारे तक्रारदार हे शिक्षक असून त्यांच्यासह अठरा शिक्षकांची वेतन पडताळणी करून त्याची नोंद सेवा पुस्तकात करण्यासाठी या सर्वांची सेवा पुस्तके लेखा अधिकारी किरण दराडे यांच्याकडे जमा करण्यात आली होती. १८ शिक्षकांचे वेतन करताना सेवा पुस्तके लेखाधिकारी यांच्याकडे सादर करून ती वेतन पडताळणी मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात दराडे यांच्या सांगण्यावरून कनिष्ठ सहाय्यक सचिन पाटील यांनी या शिक्षकांकडे प्रत्येकी सातशे रुपयांप्रमाणे १२,६०० रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ११,००० रुपये लाच घेण्याचे आरोपींनी कबूल केले होते.

त्यामुळे या दोघा लाचखोरांना पकडण्यासाठी नाशिक लाच लुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक मीरा आदमाने यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार पंकज पळशीकर, पोलीस हवालदार प्रमोद चव्हाणके, पोलीस हवालदार संदिप वणवे यांनी गुरुवारी सापळा रचला.

लेखा अधिकारी दराडे यांच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना सचिन पाटील याला पकडण्यात आले. दोन्ही आरोपीं विरोधात नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 978
लाच लुचपत लाचखोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

सराईत गुन्हेगार राहुल सोनवणे स्थानबद्ध; ‘एमपीडीए’ अंतर्गत संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई

June 11, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

पाच कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह सात जणांना अटक

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

By अनंत पांगारकरJune 12, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर – सध्याच्या विवाह पद्धतीमध्ये मुहूर्ताकडे होणारे दुर्लक्ष, अनावश्यक खर्च, दिखाऊपणा…

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

आज शुक्रवार, १२ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.