सोमवार, २१ ऑक्टोंबर
भारतीय जनता पक्षाने रविवारी ९९ उमेदवारांची विधानसभा निवडणुकीचे पहिली यादी जाहीर केली. त्या पाठोपाठ महाविकास आघाडीची यादी जाहीर होण्याची चिन्ह असताना आता तिसऱ्या आघाडीने आपले दहा उमेदवार जाहीर करत महायुती आणि महाविकास आघाडीचे टेन्शन वाढविले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरी आघाडी तयार झाल्या असून परिवर्तन महाशक्तीने सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत आपल्या दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
बच्चू कडू, संभाजी राजे, राजू शेट्टी आदींच्या उपस्थितीत ही यादी जाहीर करण्यात आले असून चांगले उमेदवार मिळाले तर, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात देखील उमेदवार दिले जाणार आहेत तसेच जेथे चांगले उमेदवार मिळतील तेथे निवडणूक लढवली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
राजू शेट्टी यांनी या संबंधीची घोषणा केली. जाहीर केलेल्या दहा जागांपैकी चार जागा प्रहार जनशक्ती पक्षाला, दोन जागा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला, तर प्रत्येकी एक-एक जागा स्वतंत्र भारत पक्ष आणि महाराष्ट्र राष्ट्र समितीला देण्यात आली आहे. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही दोन जागा देण्यात आले असून या जागांवरील उमेदवारांची अद्याप घोषणा करण्यात आली नाही.
प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बच्चू कडू २८ तारखेला अचलपूरमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.
असे आहेत उमेदवार…
अचलपूर (प्रहार जनशक्ती पक्ष) – बच्चू कडू
रावेर (प्रहार जनशक्ती पक्ष) – अनिल चौधरी
चांदवड (प्रहार जनशक्ती पक्ष) – गणेश निंबाळकर
देगलूर (प्रहार जनशक्ती पक्ष) – सुभाष साबणे
ऐरोली (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष) – अंकुश कदम
हदगाव हिमायतनगर (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष) – माधव देवसरकर
हिंगोली (महाराष्ट्र राज्य समिती) – गोविंदराव भवर
राजुरा (स्वतंत्र भारत पक्ष) – वामनराव चटप
शिरोळ आणि मिरज (स्वाभिमानी शेतकरी संघटना) – उमेदवार अद्याप जाहीर नाही.
महाराष्ट्रात परिवर्तन घडवायचे असे सांगत तिसऱ्या आघाडीच्या ‘परिवर्तन महाशक्ती’ने केली १० उमेदवारांची यादी जाहीर, महायुती, महाविकास आघाडीचे टेन्शन वाढविले
उमेदवार कोणासाठी ठरणार अडचणीचे

