Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प; रेल्वेमंत्र्यांशी बैठकीत तांत्रिक अडचणींवर तोडग्याचे संकेत

August 6, 2026

संगमनेरमध्ये विवाह सोहळ्यांसाठी ‘आचारसंहिता’ लागू; रात्री १० नंतर डीजे बंद

August 6, 2026

महावितरण कर्मचाऱ्याला धमकी देवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी राजापूरच्या प्रमोद हासेवर गुन्हा दाखल

August 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निवडणुकीच्या तोंडावर एका वाहनातून ५ कोटींची रोकड पकडली, पैसे घेऊन जाणारी गाडी आमदाराची?
गुन्हेगारी

निवडणुकीच्या तोंडावर एका वाहनातून ५ कोटींची रोकड पकडली, पैसे घेऊन जाणारी गाडी आमदाराची?

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 22, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, २२ ऑक्टोंबर

पुणे – पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास ५ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. संबंधित गाडी सत्ताधारी आमदाराची असल्याची प्राथमिक माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे-सातारा मार्गावर खेड-शिवापूर येथे पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत आहे. या नाकाबंदी दरम्यान खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ एका वाहनातून मोठी रक्कम पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. पोलिसांना संबंधित गाडीतून किती रोख रक्कम मिळाली आहे? याबाबतचा अधिकृत आकडा समजू शकलेला नाही. पण माहितीनुसार, या गाडीत पोलिसांना जवळपास ५ कोटींची रोख रक्कम मिळाली आहे. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आहे आणि पुढील तपास सुरु केला आहे.

ही गाडी एका बड्या नेत्याची तथा विद्यमान आमदाराची असल्याची माहिती सूत्रांनी दिली असल्याचे वृत्त टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीने दिले आहे.

रोख रक्कम घेऊन जाणारे वाहन राजगड पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले. या वाहनात नक्की किती रक्कम होती हे अजून स्पष्ट झालेले नाही; मात्र या वाहनात मोठी रोख रक्कम असल्याचे बोलले जात आहे. या रक्कम कोणाची? कुठे चालवली होती? आदीबाबत राजगड पोलिसांकडून पडताळणी सुरु आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सातारा रस्त्याने एका वाहनातून रोख रक्कम नेली जाणार असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी सोमवारी दुपारपासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर सापळा रचला होता. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक संशयित वाहन टोल नाक्यावर आले. यावेळी या वाहनाची तपासणी केली असता त्यात रोख रक्कम असल्याचे दिसून आले.

यावेळी पोलिसांनी संबंधित वाहन पोलिस चौकीला आणून त्यातील रोख रक्कम ताब्यात घेतली. तसेच या वाहनातील चार जणांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सध्या खेड-शिवापूर पोलीस चौकीत वरिष्ठ पोलीस आणि महसूल अधिकारी दाखल झाले आहेत. या वाहनातील रक्कमेची शहानिशा करण्याचे काम सुरु आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 965
आचारसंहिता निवडणूक आचारसंहिता रोकड पकडली
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

महावितरण कर्मचाऱ्याला धमकी देवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी राजापूरच्या प्रमोद हासेवर गुन्हा दाखल

August 6, 2026

धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

August 4, 2026

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं

August 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प; रेल्वेमंत्र्यांशी बैठकीत तांत्रिक अडचणींवर तोडग्याचे संकेत

By अनंत पांगारकरAugust 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली…

संगमनेरमध्ये विवाह सोहळ्यांसाठी ‘आचारसंहिता’ लागू; रात्री १० नंतर डीजे बंद

August 6, 2026

महावितरण कर्मचाऱ्याला धमकी देवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी राजापूरच्या प्रमोद हासेवर गुन्हा दाखल

August 6, 2026

अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचाराच्या आरोपातून युवकाची निर्दोष मुक्तता; संगमनेर अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय

August 6, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.