शनिवार, २६ ऑक्टोबर
मुंबई – शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेल्या या यादीत २२ उमेदवारांचा समावेश आहे. अहिल्यानगर शहरमधून अभिषेक कळमकर यांना तर अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांना संधी देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीने जिल्ह्यात सर्व जागांवर उमेदवार जाहीर केले असून शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर या तीन जागांवर काँग्रेस, नेवासे व श्रीगोंदा या दोन जागांवर शिवसेना व उर्वरित विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचे स्पष्ट झाले. महायुतीच्या उमेदवारांचा अद्यापही घोळ सुरूच आहे.
अद्याप ज्या जागांवरील उमेदवार शिल्लक आहे त्यांची यादी आज रात्री किंवा उद्या सकाळी पत्रकार परिषद न घेता जाहीर केली जाणार असल्याचे जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शरदचंद्र पवार पक्षाकडून ९० पैकी ६७ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेले उमेदवार पुढीलप्रमाणे…
एरंडोल – सतीश अण्णा पाटील
गंगापूर – सतीश चव्हाण
शहापूर – पांडुरंग बरोरा
परांडा – राहुल मोटे
बीड – संदीप क्षीरसागर
आर्वी -मयुरा काळे
बागलान – दीपिका चव्हाण
येवला – माणिकराव शिंदे
सिन्नर – उदय सांगळे
दिंडोरी – सुनीता चारोस्कर
नाशिक पूर्व – गणेश गीते
उल्हासनगर – ओमी कलानी
जुन्नर – सत्यशील शेरकर
पिंपरी – सुलक्षणा शीलवंत
खडकवासला -सचिन दोडके
पर्वती- अश्विनीताई कदम
अकोले -अमित भांगरे
अहिल्या नगर शहर – अभिषेक कळमकर
माळशिरस – उत्तमराव जानकर
फलटण – दीपक चव्हाण
चंदगड – नंदिनीताई भाबुळकर कुपेकर
इचलकरंजी – मदन कारंडे


