Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मिस्टर संजय राऊत तुम्ही सुपारी बहाद्दर, पोलिसांनो शिवसेना नेते राऊतांची बदनामी करणाऱ्या वाचाळवीर वसंत देशमुखवर गुन्हा दाखल करा… शिवसैनिक पंकज पडवळ यांची मागणी
महाराष्ट्र संवाद विशेष

मिस्टर संजय राऊत तुम्ही सुपारी बहाद्दर, पोलिसांनो शिवसेना नेते राऊतांची बदनामी करणाऱ्या वाचाळवीर वसंत देशमुखवर गुन्हा दाखल करा… शिवसैनिक पंकज पडवळ यांची मागणी

वाचाळवीर देशमुख याच्या वक्तव्याचा बघा व्हिडिओ....
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/10/2024Updated:28/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, २७ ऑक्टोबर

माजी खासदार सुजय विखे यांच्या सभेत वाचाळवीर वसंत देशमुख यांनी राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉक्टर जयश्री यांच्यावर आक्षेपार्ह टीका करताना महिलांची बदनामी केल्याचे प्रकरण राज्यभरात तापले असताना याच सभेत वसंत देशमुख याने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर देखील आक्षेपार्ह विधान केल्याचे समोर आले आहे. यामुळे खासदार राऊत यांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पठार भागातील शिवसैनिक पंकज पडवळ यांनी केली आहे.

वास्तविकता या सभेत केलेल्या वक्तव्याप्रकरणी पोलिसांकडूनच गुन्हे दाखल होणे अपेक्षित असताना देखील पोलिसांकडून दबावाखाली आरोपींची पाठराखण सुरू असल्याचे दिसते. जयश्री थोरात यांच्या बद्दल वादग्रस्त विधान करत वाचाळवीर देशमुख याने महिलांचा रोष ओढवून घेतला असताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्याबाबत देखील खोटे आरोप करत त्यांची बदनामी केली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पंकज पडवळ यांनी यासंदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे तक्रार अर्ज दिला असून पोलिसांनी देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पडवळ यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे की, भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांची धांदरफळ खुर्द येथे सभा झाली. या सभेत भाजपचे नेते वसंत देशमुख यांनी भाषण करताना जयश्री थोरात यांच्या संदर्भात टीका करत असतानाच खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली. “बाळासाहेब थोरात यांनी आजपर्यंत तिकीट कसे मिळविले माहित आहे का, असा प्रश्न करत हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी जो उमेदवार शक्यतो कमी मते घेईल असा कॅंडिडेट आम्हाला द्या, त्याच्या बदली आम्ही काहीही देतो तुम्हाला, असे सांगून उमेदवारी मिळवितात”. पाच वर्षांपूर्वी मुंबईला मी आमच्या नातेवाईकांच्या बायकोच्या अंत्यविधी करता गेलो असता त्यांच्या घरी संजय राऊत आले होते. नातेवाईकांनी माझी ओळख करून दिली हे काँग्रेसचे मोठे लीडर आहेत पण त्यांना सध्याचे काँग्रेसवाले आवडत नाही. तेव्हा संजय राऊत यांनी मला विचारले की आमच्या शिवसेनेला तिथे स्थान का मिळत नाही, तेव्हा मी त्यांना म्हटलं, “तुम्हाला पैसे पाहिजे, मिस्टर संजय राऊत तुम्ही सुपारी बहाद्दर आहात.”

देशमुख यांनी त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसताना भर सभेत अशा प्रकारचे खोट्या स्वरूपाचे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. आरोपाच्या माध्यमातून त्यांची बदनामी केली आहे तसेच देशमुख यांच्या खोट्या वक्तव्यामुळे जनसामान्यात चुकीचा मेसेज जात असून यामुळे समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोपीचा प्रयत्न आहे.

त्यामुळे पोलिसांनी देशमुख याच्यावर तात्काळ बदनामीचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

वाचाळवीर देशमुख याच्या वक्तव्याचा बघा व्हिडिओ….

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/10/VID-20241027-WA0030.mp4

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 18,349
उद्धव ठाकरे पंकज पडवळ वसंत देशमुख संगमनेर तालुका पोलीस संजय राऊत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar21/09/20260

मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे चीज होईल आणि…

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.