Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अजितदादांचा आर. आर. आबांवर मोठा आरोप, म्हणाले माझा केसाने गळा कापला? सिंचन फाईलवरील सहीवरून नऊ वर्षानंतर अजित पवारांकडून आबा लक्ष्य
निवडणूक

अजितदादांचा आर. आर. आबांवर मोठा आरोप, म्हणाले माझा केसाने गळा कापला? सिंचन फाईलवरील सहीवरून नऊ वर्षानंतर अजित पवारांकडून आबा लक्ष्य

संजयकाका पाटलांच्या सभेत आरोप
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/10/2024Updated:30/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

प्रवीण पूरो | मुंबई

राज्यातील आदर्श राजकारणी समजल्या जाणाऱ्या तत्कालीन उप मुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जोरदार हल्लाबोल करत मोठा गौप्यस्फोट केला. भाजपने सिंचन घोटाळ्यावरून अजितदादांवर आरोप करत रान उठवलं होतं. मात्र, सिंचन घोटाळ्याची खुली चौकशी करण्यासाठी आर. आर. पाटील यांनी फाइलवर सही केली होती, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.

हा केसानं गळा कापण्याचा धंदा आहे, असं सांगत अजितदादांनी आर. आर. आबांचे तासगावातील राष्ट्रवादीचे काँग्रसचे (अजित पवार) संजयकाका पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) उमेदवार म्हणून आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी अर्ज भरला आहे.

संजयकाका पाटील यांच्याकरता आयोजित प्रचार सभेत अजितदादा पवार बोलत होते. तेव्हा, सिंचन घोटाळ्यावरून अजितदादांनी आर. आर. पाटील यांच्यावर खापर फोडलं. अजितदादा म्हणाले, माझ्यावर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. पण, १९६० पासून ते माझ्यावर आरोप लागेपर्यंत कर्मचाऱ्याच्या पगारांवर ४२ हजार कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. मात्र, माझ्यावर ७० हजार कोटींचा आरोप केल्यानं माझी वाटच लागली.

माझ्यावर आरोप झाल्यानंतर एक फाइल तयार करण्यात आली. ती फाइल गृहखात्याकडे गेली. माझी चौकशी करण्यात यावी म्हणून आर. आर. आबांनी सही केली होती. हा केसानं गळा कापण्याचे धंदा आहे, असं अजितदादांनी म्हटलं.

२०१४ मध्ये राष्ट्रवादीनं पृथ्वीराज बाबा यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि राष्ट्रपती राजवट लागली. सरकार गेलं. तेव्हा, तत्कालीन राज्यपालांनी म्हटलं, मी सिंचन घोटाळ्याच्या फाइलवर सही करणार नाही. निवडून आलेले मुख्यमंत्री करतील.

त्यानंतर २०१४ मध्ये फडणवीस यांचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळ्याच्या फाइलवर सही केली. त्यावेळी फडणवीसांनी मला त्यांच्या घरी बोलावून घेतलं. फडणवीसांनी सांगितलं, ‘सिंचन घोटाळ्याच्या फाइलवर सही मुख्यमंत्र्यांसाठी राहिली होती. पण, तुमच्या आबांनी तुमची खुली चौकशी करण्यासाठी सही केली होती. खरेच त्यावर आबांची सही होती. मला पाहून वाईट वाटलं. आपलं काहीतरी चुकलं असेल, म्हणून मला कामाला लावलं, असं अजितदादा म्हणाले.

अजित पवारांच्या या आक्षेपाचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला. ज्यांनी गैर केलं त्यांची चौकशी करण्याच्या सूचना चुकीच्या कशा असू शकतात असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. चुकीचं काही केलं नसेल तर अजित पवार घाबरले का? अशी विचारणा वडेट्टीवार यांनी केली. चोर तो चोर वर शिरजोर असा हा प्रकार असल्याचं विरोधी पक्षनेते म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 581
अजित पवार आर. आर. पाटील विधानसभा निवडणूक संजयकाका पाटील
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहर व परिसरातील गरीब, गरजू आणि होतकरू युवक-युवतींना पोलीस भरतीसाठी…

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.