Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गोपनीयतेचा भंग… उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर राज्यपालांनी गुन्हा दाखल करावा – राऊत
राजकारण

गोपनीयतेचा भंग… उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर राज्यपालांनी गुन्हा दाखल करावा – राऊत

९० टक्के नाराजांची समजूत काढण्यात यशस्वी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/10/2024Updated:30/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, ३० ऑक्टोबर

विशेष प्रतिनिधी / मुंबई

सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणात अजित पवारांची खुली चौकशी करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी फाईलवर सही केल्याची माहिती उघड करत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी गोपनीयतेचा भंग केल्याने त्यांच्याविरोधात राज्यपालांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी केली आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर आरोप केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

खासदार राऊत म्हणाले, आर. आर. पाटील अत्यंत प्रामाणिक आणि कर्तबगार व्यक्ती होते. त्यांनी गृहमंत्री म्हणून कधीच चुकीचं काम केलं असेल असं आम्हाला वाटत नाही. त्यांचे केस फार लहान असल्याने ते केसाने गळा कापू शकत नाहीत, असा टोला राऊत यांनी अजित पवारांना लगावला.

माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सिंचन घोटाळ्यावर सही केल्याचे अजित पवारांनी जनतेला दाखवले. तसेच फडणवीस यांनी त्यांना सही केल्याचे दाखवले. याकरता आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्यपालांनी गुन्हा दाखल करायला हवा. या दोघांनी संविधानाप्रमाणे गोपनीयतेची शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर अशी माहिती सार्वजनिक करणे, हा गोपनीयतेचा भंग असून तो मोठा गुन्हा आहे. या कारणाने राज्यपालांनी या दोघांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी आदेश दिले पाहिजेत, अशी मागणी राऊत यांनी केली.

महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. तथापि ९० टक्के नाराजांची समजूत काढण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो, असा दावा त्यांनी केला. आता आम्ही एकत्र बसणार आहोत. आमच्या प्रत्येक घटक पक्षाने उमेदवारी अर्ज भरलाय. त्यांची समजूत काढू. महाविकास आघाडीला निवडणूक जिंकायची असल्याकारणानं दोन-चार जागा मित्रपक्षानं जास्त लढवल्या किंवा जिंकल्या तर इतर घटक पक्षांना त्यात वाईट वाटण्याचं कारण नाही.

विदर्भामध्ये काँग्रेस मजबूत असल्याकारणाने तिथे त्यांच्या जास्त जागा आहेत. या राज्यात आम्हाला बदल घडवायचा आहे. यासाठी आम्हाला एकत्र राहणं फार गरजेचं आहे. बंडखोरी केलेल्या उमेदवाराची समजूत काढण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. त्यात यशस्वी होऊ, असं ते म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 759
अजित पवार देवेंद्र फडणवीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

By Annant Ppangarkar16/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राजापूर ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांना पुरवठा करण्यात येत असलेल्या पिण्याच्या पाण्याबाबत अत्यंत…

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.