Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

मंगळवार, ०६ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

06/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जगाचा नकाशा बदलण्याचे काम आयर्न लेडीने केले – आमदार थोरात
सामाजिक

जगाचा नकाशा बदलण्याचे काम आयर्न लेडीने केले – आमदार थोरात

अमृत उद्योग समूहाच्यावतीने स्वर्गीय इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, ३१ ऑक्टोंबर

संगमनेर – बांगलादेशची निर्मिती, बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थांचे विलीनीकरण यासारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेणाऱ्या इंदिरा गांधी यांचे व्यक्तिमत्व धाडसी व पराक्रमी होते .देशाच्या एकात्मता व अखंडतेसाठी त्यांनी बलिदान दिले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा मोठा दबदबा निर्माण करणाऱ्या स्वर्गीय इंदिराजी या देशाचे सर्वात कणखर नेतृत्व ठरले असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखानाच्या शक्ति स्थळावर इंदिरा गांधी यांच्या चाळीसाव्या स्मृतिदिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, बाबा ओहोळ, सुधाकर जोशी, आर. बी. राहणे, राजेंद्र गुंजाळ, निर्मलाताई राऊत यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे संचालक, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, प्रा. बाबा खरात आदी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले, दुसऱ्या महायुद्धानंतर बांगलादेशची निर्मिती करून जगाचा नकाशा बदलण्याचे काम आयर्न लेडी इंदिरा गांधी यांनी केले आहे. अत्यंत पराक्रमी व धाडसी असलेल्या इंदिराजींनी अनेक संस्थांनी खालसा केली. बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.

अणुबॉम्बच्या निर्मितीसह अनेक उपग्रह अवकाशात सोडले. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा दबदबा निर्माण केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा सहवास व पंडित जवाहरलाल नेहरू यांचे संस्कार लाभलेल्या इंदिरा गांधी यांनी देशाच्या एकात्मतेमध्ये कधीही तडजोड केली नाही. आणि या देशाची अखंडता टिकवण्यासाठी त्यांनी स्वतःचे बलिदान दिले.

त्यांचे योगदान पुढील सर्व पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

डॉ. तांबे म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी कारखाना कार्यस्थळावर इंदिराजी गांधी यांच्या कार्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी याकरता शक्तिस्थळ निर्माण केले आहे. दरवर्षी या ठिकाणी अभिवादनानिमित्त राज्यभरातील विविध मान्यवरांचे व्याख्यान आयोजित केले जातात.

गरीबी हटावचा नारा देऊन समाजातील दिनदलीत आणि गोरगरिबांची आई बनलेल्या इंदिरा गांधी यांनी स्त्रियांच्या रक्षणाकरता सुवर्ण मंदिरामध्ये भारतीय सैन्य पाठवले आणि यातूनच खलिस्तानवादी यांचा रोष ओढावून त्यांना स्वतःचा प्राण गमवावा लागला. हे कणखर व्यक्तिमत्व देशवाशीवांसाठी सदैव अभिमानास्पद ठरले आहे.

यावेळी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 718
इंदिरा गांधी पुण्यतिथी बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- उडीसा आणि आसाम या राज्यांतून पुण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी…

मंगळवार, ०६ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

06/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.