Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गणेश कारखान्याचा इतिहासात प्रथमच तीन हजार रुपयांचा दर!
शेती व सहकार

गणेश कारखान्याचा इतिहासात प्रथमच तीन हजार रुपयांचा दर!

बंद पडण्याच्या मार्गावर होता कारखाना... थोरात, कोल्हेंनी मिळून दिली उर्जितावस्था
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, ०२ नोव्हेंबर

राहाता – गणेश कारखान्याच्या इतिहासात प्रथमच तीन हजार रुपये उसाला दर मिळाल्याने चैतन्याचे वातावरण पसरले आहे. कारखाना कार्यस्थळावर संचालक मंडळ, कर्मचारी, सभासद, शेतकरी यांनी आनंदोत्सव साजरा केला.

कर्मचाऱ्यांना पगार बोनस यासह रिटेन्शन रक्कम मिळाल्याने प्रथमच इतकी आनंदात दिवाळी आम्ही साजरी करतो आहोत, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी ज्यांनी योगदान दिले असे ज्येष्ठ काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे सर्वांनी आभार व्यक्त केले.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, माजी अध्यक्ष अॅड. नारायण कार्ले, भगवान टिळेकर, डॉ. एकनाथ गोंदकर, संपतराव चौधरी, अनिल गाढवे, बाळासाहेब चोळके, महेंद्र गोर्डे, संपतराव हिंगे, अरविंद फोपसे, आलेश कापसे, नानासाहेब नळे, विष्णुपंत शेळके, विनायक देठे, सचिन आहेर, सुभाष कापसे आदींसह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील हंगामात २ लाख १७ हजार टन इतके गाळप झाले. जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्यात सर्वाधिक साखर गाळप उतारा गणेशचा निघाला. उसाची उपलब्धता कमी असताना देखील हंगाम यशस्वी करून दाखवला. त्याचप्रमाणे चालू हंगामात देखील एकजुटीने कार्यरत राहून आ. बाळासाहेब थोरात व युवानेते विवेक कोल्हे यांनी अनेक अडचणी आल्यानंतरही कारखाना यशस्वी सुरू केला. अनेक राजकीय अडचणी कारखान्याला कर्ज मिळण्यासाठी आल्या. त्यावर मात करून घडी बसविण्यात सर्व यशस्वी झाले.

मागील संचालक मंडळाच्या काळात पगार आणि इतर रकमा थकित होत्या. आर्थिक घडी विस्कटून गेली होती. त्यामुळे नवीन संचालक मंडळाला अनेक आव्हानांना तोंड देऊन हे प्रश्न सोडवावे लागत आहेत. ऊस पळवापळवी करून कारखान्याला त्रास देऊ नये आणि गणेश कारखाना विरोधकांनी अडथळे आणू नये. नुकतेच कोट्यवधी रुपये शेतकरी, कर्मचाऱ्यांना अदा झाल्याने राहाता आणि गणेश परिसरात बाजारपेठ फुलण्यासाठी मदत झाली आहे.

उसाला २०२३-२४ हंगामात सर्वाधिक तीन हजार रुपये दर मिळाला आणि कर्मचारी बांधवांचे देखील प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत झाली. यासह सभासद आणि ऊस देणारे बिगर सभासद यांनाही मोफत साखर देण्याचा पूर्वनियोजनाप्रमाणे झालेला निर्णय हा कौतुकास्पद आहे. याबद्दल फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,338
ऊस भाव गणेश कारखाना बाळासाहेब थोरात विवेक कोल्हे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.