Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगरच्या ९ मतदारसंघांत बंडखोरी, ३ मतदारसंघात पक्ष आदेशाचे पालन; अशा आहे त्या प्रमुख लढती…
निवडणूक

अहिल्यानगरच्या ९ मतदारसंघांत बंडखोरी, ३ मतदारसंघात पक्ष आदेशाचे पालन; अशा आहे त्या प्रमुख लढती…

प्रमुख लढतींकडे लक्ष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/11/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, ०५ नोव्हेंबर

अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ मतदारसंघांपैकी ५ विधानसभा मतदारसंघांत महायुतीच्या तर ४ विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही बंडखोरांचा त्रास सहन करावा लागणार आहे. केवळ संगमनेर, कोपरगाव, कर्जत-जामखेड हे तीन मतदारसंघ बंडखोरांच्या बंडखोरीतून सेफ राहिले आहे.

महायुतीतील ५ जागांपैकी ३ जागांवर भाजपच्या, २ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. तर महाविकास आघाडीमधील ४ पैकी ३ जागांवर ठाकरे गटाने तर एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) बंडखोरी केली आहे.

काँग्रेसच्या एका महिला पदाधिकाऱ्याने नगर शहरात बंडखोरी केली आहे. अकोल्यात महायुतीचे विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी अपक्ष म्हणून राहातामध्ये महायुतीत भारतीय जनता पक्षाकडून लढणाऱ्या महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात भाजपचे डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी, राहुरीत महायुतीचे शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात भाजपचेच माजी तालुकाध्यक्ष साहेबराव म्हसे, पारनेरमध्ये महायुतीचे काशिनाथ दाते यांच्या विरोधात त्यांच्याच राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांनी तर श्रीरामपूरमध्ये काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले महायुतीचे विद्यमान आमदार लहू कानडे यांच्या विरोधात शिवसेनेचे (शिंदे गट) माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी बंडखोरी केली आहे.

महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर यांच्या विरोधात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे व काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या समन्वयक मंगला भुजबळ यांनी बंडखोरी केली. अकोल्यात राष्ट्रवादीचे अमित भांगरे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे मधुकर तळपाडे व मारुती मेंगाळ यांनी बंडखोरी केली आहे. पारनेरमध्ये राष्ट्रवादीच्या राणी लंके यांच्या विरोधात ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी तर श्रीगोंद्यात ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांनी बंडखोरी केली आहे.

महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही बाजूकडील वरिष्ठ पातळीवरील नेतृत्वाने बंडखोरी शमविण्याचे प्रयत्न केले, मात्र त्यात यश आले नाही. बंडखोर उमेदवारांनी एकतर आपला मोबाईल बंद करून ठेवला होता किंवा त्यांनी वरिष्ठ नेतृत्वाला जुमानले नाही. नगर शहरात ठाकरे गटाचे बंडखोर जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे उमेदवारी मागे घेण्यासाठी आले असतानाही त्यांनी माघार घेतली नाही. आपल्याला उमेदवारी मागे घेण्यासाठी पंधरा सेकंद उशीर झाल्याचा दावा गाडे यांनी केला मात्र प्रत्यक्षात ते निवडणूक कार्यालयात अर्धा तास आधीच हजर झालेले होते.

अशा आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती…

अकोले मतदारसंघ – किरण लहामटे महायुती (अजित पवार गट) विरुद्ध अमित भांगरे महाविकास आघाडी (शरद पवार गट) विरुद्ध वैभव पिचड (अपक्ष भाजप बंडखोर)

संगमनेर मतदारसंघ – अमोल खताळ महायुती (शिंदे यांची शिवसेना) विरुद्ध बाळासाहेब थोरात महाविकास आघाडी (काँग्रेस)

श्रीरामपूर मतदारसंघ – लहू कानडे महायुती (अजित पवार गट) विरुद्ध हेमंत ओगले महाविकास आघाडी (काँग्रेस) विरुद्ध भाऊसाहेब कांबळे महायुती (शिंदे यांची शिवसेना)

कोपरगाव मतदारसंघ – आशुतोष काळे महायुती(अजित पवार गट) विरुद्ध संदीप वर्षे महाविकास आघाडी (शरद पवार गट)

राहुरी मतदारसंघ – शिवाजी कर्डिले महायुती (भाजप) विरुद्ध प्राजक्त तनपुरे महाविकास आघाडी (शरद पवार गट)

नेवासा मतदारसंघ – विठ्ठल लंघे महायुती (शिंदे यांची शिवसेना) विरुद्ध शंकरराव गडाख महाविकास आघाडी (ठाकरे यांची शिवसेना) विरुद्ध बाळासाहेब मुरकुटे अपक्ष (भाजप बंडखोर)

शेवगाव मतदारसंघ – मोनिका राजळे महायुती (भाजप) विरुद्ध प्रताप ढाकणे महाविकास आघाडी (शरद पवार गट) विरुद्ध चंद्रशेखर घुले अपक्ष विरुद्ध हर्षदा काकडे अपक्ष

श्रीगोंदा मतदारसंघ – विक्रमसिंह पाचपुते महायुती (भाजप) विरुद्ध अनुराधा नागवडे महाविकास आघाडी (उद्धव ठाकरे यांची शिवसेना) विरुद्ध राहुल जगताप अपक्ष विरुद्ध अण्णासाहेब शेलार वंचित आघाडी

कर्जत-जामखेड मतदारसंघ – प्रा. राम शिंदे महायुतीत (भाजप) विरुद्ध रोहित पवार महाविकास आघाडी (शरद पवार गट)

पारनेर मतदारसंघ – काशिनाथ दाते महायुती (अजित पवार गट) विरुद्ध राणी लंके महाविकास आघाडी (शरद पवार गट) विरुद्ध संदेश कार्ले अपक्ष विरुद्ध विजय औटी अपक्ष

अहमदनगर शहर मतदार संघ – संग्राम जगताप महायुती (अजित पवार गट) विरुद्ध अभिषेक कळमकर महाविकास आघाडी (शरद पवार गट) विरुद्ध शशिकांत गाडे अपक्ष (ठाकरे यांची शिवसेना बंडखोर)

शिर्डी मतदारसंघ – राधाकृष्ण विखे महायुती (भाजप) विरुद्ध प्रभावती घोगरे महाविकास आघाडी (काँग्रेस) विरुद्ध राजेंद पिपाडा अपक्ष (भाजप बंडखोर)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 578
अहिल्यानगर प्रमुख लढती विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.