Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शेतकऱ्याकडे लाच मागणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञावर गुन्हा दाखल

30/10/2026

शुक्रवार ३० ऑक्टोबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल!

30/10/2026

संगमनेरात ५ लाखांच्या मुक्या जनावरांचा जीव वाचला; गोहत्या करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

29/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रश्मी शुक्लांसाठी सरकारची लाचारी… संजय वर्मांची नियुक्ती तात्पुरती असल्याच्या आदेशाने खळबळ
प्रशासन

रश्मी शुक्लांसाठी सरकारची लाचारी… संजय वर्मांची नियुक्ती तात्पुरती असल्याच्या आदेशाने खळबळ

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई | विशेष प्रतिनिधी

निवडणूक आयोगाच्या आदेशाने बदली करण्यात आलेल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या जागी आणण्यात आलेल्या संजय वर्मा यांची नियुक्ती तात्पुरत्या काळासाठी करण्याचे आदेश काढत राज्य सरकारने निवडणूक आयोगालाही ठेंगा दाखवला आहे.

शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून निवडणूक आयागाने संजय वर्मा यांना पोलीस संचालकपदी नियुक्त करताना काढलेल्या आदेशात तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नाही, तरीही राज्य सरकारच्या आदेशात मात्र तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख का करण्यात आला? या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.

२४ तासाच्या आत संजय वर्मा यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीचे आदेश काढा, अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करु, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, रश्मी शुक्ला यांना मिळालेली मुदतवाढ ही फक्त पोलीस महासंचालक पदासाठीच होती, दुसऱ्या कोणत्याही पदासाठी नाही, त्यांनी वयाची ६० वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि ज्याक्षणी निवडणूक आयोगाने त्यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवले त्याक्षणी त्या कायद्यानुसार निवृत्त झालेल्या आहेत, असे असताना त्यांना रजेवर कसे पाठवले जाते. महाराष्ट्रात एकच अधिकारी सरकारच्या सर्वात लाडक्या आहेत का, रश्मी शुक्लाच का, दुसरे अधिकारी नाहीत का, सदानंद दाते, रितेशकुमार, संजय वर्मा, फणसाळकर हे सक्षम अधिकारी नाहीत का? ६० वर्ष झाल्यांनतरही एकाच व्यक्तीसाठी आग्रह का, याचे उत्तर द्यावे, असं आव्हान काँग्रेसने दिलं आहे.

रश्मी शुक्ला निवृत्त झाल्या तरी त्यांच्यासाठी वेगळा कायदा लावला जातो, कायद्याचा चुकीचा अर्थ काढून त्यांना नियुक्ती दिली जाते. रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यासाठी सर्व कायदे, नियम, संविधान, सुप्रिम कोर्टाचा निकाल बाजूला ठेवण्याचे काम उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र सरकार करत आहे. रश्मी शुक्ला यांच्या मदतीने निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा भाजपा युती सरकारचा हा प्रयत्न आहे. पोलीस वाहनातून भाजपा महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवले जाते अशी माहिती मिळाल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार सांगत आहेत यातच रश्मी शुक्लाच का, याचे उत्तर दडले आहे, असेही अतुल लोंढे म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 706
रश्मी शुक्ला संजय वर्मा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील शासकीय आणि आरक्षित जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात प्रशासकीय हालचालींना वेग, मोजणीसह चौकशीचे आदेश

22/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

शेतकऱ्याकडे लाच मागणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञावर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar30/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शेतीपंपासाठी नवीन विजेचा पोल उभा करण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे…

शुक्रवार ३० ऑक्टोबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल!

30/10/2026

संगमनेरात ५ लाखांच्या मुक्या जनावरांचा जीव वाचला; गोहत्या करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

29/10/2026

गौण खनिज माफियांचा हैदोस; कारवाईसाठी गेलेल्या परिविक्षाधीन प्रांताधिकाऱ्यांना डंपरखाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न

29/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.