Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर विधानसभा निवडणूक… ‘दादा’ हे वागणं बरं नव्हं ! इलेक्शन रंग घेऊ लागले आणि टायगर गायब…
पत्रकारिता

संगमनेर विधानसभा निवडणूक… ‘दादा’ हे वागणं बरं नव्हं ! इलेक्शन रंग घेऊ लागले आणि टायगर गायब…

बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी आलेला टायगर शिकार करतानाच सुस्तावला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/11/2024Updated:07/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – अनंत पांगारकर

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या गावांमध्ये चार सभांच्या माध्यमातून विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत टायगर अभी जिंदा है! म्हणणारे माजी खासदार ‘दादा’ निवडणुकीत उभे राहण्याऐवजी मतदारसंघातूनच गायब झाले. त्यामुळे दादा प्रेमी कार्यकर्त्यांनी दादा हे वागणं बरं नव्हं… अशा शब्दात खाजगीत बोचरी टीका सुरू केली आहे. त्यामुळे टायगर जिंदा आहे म्हणत कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करणारा टायगर आता नेमका कुठे गेला, यामागे काही गौड बंगाल आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर दादा उत्तरेत विशेषत: संगमनेर विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाले. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे संकेत देत त्यांनी जिल्हा परिषद गटांमध्ये सभांचा धडाका लावला. यावेळी प्रथमच थोरातांना निवडणुकीत टस्सल देणारा आणि मॅनेज न होणारा चेहरा मिळाल्याने विरोधकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला. सभांच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जाण आणली. संगमनेरची निवडणूक ते आता कोणत्याही परिस्थितीत लढवतीलच, अशा टप्प्यावर आल्यानंतर त्यांनी निवडणुकीतून काढता पाय घेतला आणि थोरात यांच्या विरोधात भाजपमधून समर्थक असलेल्या अमोल खताळ यांचा चेहरा शिंदेंच्या शिवसेनेकडून ऐनवेळी समोर आणला गेला. त्यामुळे निवडणुकीतील रंगत निघून गेली.

निवडणूक रंगात येऊ लागली असताना महायुतीतील अंतर्गत नाराजी समोर येऊ लागली आहे. मतदार संघांमध्ये सभा घेऊन वातावरण निर्मिती करणारे दादा निवडणूक सोडून ऐनवेळी कोठे गायब झाले असा प्रश्न समर्थक कार्यकर्ते खासगीत विचारत आहे. विखे-थोरात हे पारंपारिक राजकीय विरोधक प्रथमच निवडणुकीत एकमेकांविरोधात मैदानात उतरणार असल्याने हा मतदारसंघ राज्यात हाय व्होल्टेज ठरला होता. राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले होते. मात्र आता तो फुसका बार ठरला आहे.

पिता-पुत्रांची पक्षीय ताकद आणि दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत असलेली पोहोच लक्षात घेता संगमनेर विधानसभा मतदार संघाची उमेदवारी ते सहजपणे भाजपाकडे खेचून आणतील अशी परिस्थिती निर्माण झाली असताना अचानकपणे जादूची कांडी फिरावी त्याप्रमाणे मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. तरीदेखील दादांना शिवसेनेकडून उमेदवारी अवघड नव्हती. मात्र त्यांनी संगमनेरकरांना उमेदवारी न करता पुन्हा एकदा हुलकावणी दिली.

दक्षिणच्या निवडणुकीत पराभवामुळे जखमी झालेला टायगर डरकाळी फोडत बाळासाहेब थोरात यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत तुटून पडल्याने टायगर खरोखरच जिंदा आहे असे चित्र निर्माण झाले असताना ऐनवेळी संगमनेर विधानसभा निवडणुकीतून टायगर गायब झाल्याने टायगरला डोक्यावर घेऊन नाचणारे कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज झाले असून ‘दादा हे वागणं बरं नव्ह’ असे म्हणू लागले आहे, एवढं मात्र नक्की!

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 22,402
टायगर विधानसभा निवडणूक संगमनेर विधानसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.