Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ठाकरेंच्या उमेदवाराला ईव्हीएममध्ये हेराफेरी करून निवडून आणतो सांगत केली ४२ लाखाची खंडणी मागणी, पैसे देत नाही म्हटल्यावर उमेदवार पाडण्याची धमकी देत झाला होता पसार, परप्रांतीयाला पोलीस पथकाने पकडले!
गुन्हेगारी

ठाकरेंच्या उमेदवाराला ईव्हीएममध्ये हेराफेरी करून निवडून आणतो सांगत केली ४२ लाखाची खंडणी मागणी, पैसे देत नाही म्हटल्यावर उमेदवार पाडण्याची धमकी देत झाला होता पसार, परप्रांतीयाला पोलीस पथकाने पकडले!

गांभीर्य लक्षात घेत पोलिसांची तत्पर कारवाई
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, ७ नोव्हेंबर 

नाशिक – विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन हॅक करून उमेदवाराला निवडून आणतो असे सांगत त्याने ४२ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याने नाशिक मधील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गिते यांना विधान सभा निवडणुकीत मशिन हॅक करून पाडण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्या परप्रांतीयाला नाशिक पोलिसांनी शोध घेत बेड्या ठोकल्या आहेत.

भगवानसिंग नारायण चव्हाण (वय ३४ मुळ रा. अजमेर राजस्थान हल्ली विठू माऊली कॉलनी, मखमलाबाद, म्हसरूळ लिंकरोड) असे खंडणी मागत धमकी देणाऱ्या संशयिताचे नाव आहे. चव्हाण याला शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने अल्पावधीत संशयितास मखमलाबाद शिवारातून हुडकून काढले असून, त्यास मुंबईनाका पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.

नाशिकमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून वसंत गीते निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीत विजय मिळवून देण्याची ग्वाही देत संशयिताने ४२ लाखाची खंडणी मागितली होती. मात्र त्यास पैसे देण्यास नकार देण्यात आल्याने त्याने पराभव करण्याची धमकी देत पोबारा केला होता.

झटपट पैसे मिळविण्याच्या नादात आरोपीने हा गुन्हा केल्याचे समोर येत असून अधिक तपास उपनिरीक्षक रविंद्र बागुल करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मार्बलचे काम करण्यासाठी नाशिक शहरात आलेल्या राजस्थानी चव्हाण याने मंगळवारी (दि.५) दुपारच्या सुमारास मुंबईनाका परिसरातील शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या मध्य नाशिक मतदार संघाचे उमेदवार वसंत गिते यांचे संपर्क कार्यालय गाठले होते. प्रचार कार्यालय प्रमुख आनंद शिरसाठ यांची भेट घेत त्याने निवडणुकीत ईव्हीएम मशिन हॅक करून पडलेल्या दहा मतदानापैकी काही मते आपोआप गीते यांच्या खात्यात जमा होतील, असे सांगत उमेदवारास निवडून आणण्याची ग्वाही दिली.

त्याने या कामाच्या मोबदल्यात ४२ लाख रूपये द्यावे लागतील तसेच अॅडव्हॉन्स म्हणून पाच लाख रूपयांची तात्काळ मागणी केली. कार्यालय प्रमुख शिरसाठ यांनी खातरजमा करीत त्यास पैसे देण्यास नकार दिल्याने संशयिताने शिरसाठ यांना पैसे न दिल्यास निवडणुकीचे प्रोग्रामिंग करणारे माझे ओळखीचे असून ईव्हीएम मशिन हॅक करून तुमच्या उमेदवाराचा पराभूत करेन अशी धमकी देत धुम ठोकली होती.

या संदर्भात शिरसाट यांच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला निवडणूक आणि ईव्हीएम शी संबंधित प्रकरण असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याची गंभीर दखल घेत संशयित आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना पोलिसांना केल्या होत्या. त्यामुळे नाशिकची पोलीस यंत्रणा कामाला लागली होती.

हा गुन्हा शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाकडे वर्ग करण्यात आल्याने वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथके संशयिताच्या शोधार्थ रवाना करण्यात आली होती.

मखमलाबाद शिवारात संशयित वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्याने पथकांनी परिसर पिंजून काढत विठू माऊली कॉलनी भागात संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीला मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 696
खंडणी निवडणूक विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

By Annant Ppangarkar17/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील राजापूरच्या जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या निवड…

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.