Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

५२ हजार रुपयांच्या अवैध अग्निशस्त्रासह युवक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दापोली आणि गुहागरच्या प्रचारातून भाजप बाहेर, रामदास कदम यांना नजर कैदेत ठेवण्याची मागणी
निवडणूक

दापोली आणि गुहागरच्या प्रचारातून भाजप बाहेर, रामदास कदम यांना नजर कैदेत ठेवण्याची मागणी

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

ऐन निवडणूक काळात गुहागरमध्ये महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रचार थांबवला आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी प्रचार थांबवला आहे. केवळ गुहागरच नाही तर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दापोलीमध्येही शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांचा प्रचार थांबवला आहे. मतदानाला केवळ आठ दिवस बाकी असताना जिल्हाभरात भाजपने प्रचाराचं काम थांबवल्यामुळे महायुतीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

रामदास कदम यांनी तात्काळ डॉ. विनय नातू आणि भाजपची माफी मागावी. अन्यथा संध्याकाळपर्यंत आम्ही आमचा निर्णय घेऊ, अशी आक्रमक भूमिका भाजपकडून घेण्यात आली आहे. विनय नातू हे आमच्यासाठी सर्वोच्च आहेत. त्यामुळे आमच्या नेत्यावर कोणीही काही बोललेलं आम्ही सहन करणार नाहीत. रामदास कदम आणि ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांची मिलीभगत आहे, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.

रामदास कदम यांना नजरकैदेत ठेवा….

दापोलीतून योगेश कदम तर गुहागरमधून रामदास कदम यांचा दुसरा मुलगा सिद्धेश कदम याला उमेदवारी देण्यासाठी रामदास कदम यांचा डाव आहे, असादेखील आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी रामदास कदम यांना नजरकैदेत ठेवावे किंवा मनोरुग्णालयात ठेवावे, अशी मागणी भाजपच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांकडे केली आहे. निवडणुकीनंतर निकाल वेगळे आल्यास भाजपाला जबाबदार धरू नये, असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे वरिष्ठ नेत्यांना स्पष्ट संकेत दिले आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विपूल कदम हे भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी गुहागरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांची आता भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरु असल्याची माहिती आहे. माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्यासह जिल्हाध्यक्ष केदार साठे आणि तीनही तालुक्याचे तालुकाध्यक्ष बैठकीत उपस्थित आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 737
भाजप महायुती रामदास कदम
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महायुतीत बंडखोरीची चिन्हे; शिवसेनेचं डोकं उडवण्याचं काम भाजप करत आहे: अब्दुल सत्तार यांच्या आरोपाने महायुतीत खळबळ

01/06/2026

भाजपची मोठी खेळी! प्रवेश करताच प्राजक्त तनपुरेंना अहिल्यानगरमधून विधानपरिषदेची उमेदवारी, भाजपच्या ११ उमेदवारांची घोषणा

01/06/2026

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

25/05/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

By Annant Ppangarkar21/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: एका दुःखद प्रसंगासाठी एकत्र आलेल्या नातेवाईकांवर नियतीने आणखी एक भीषण…

५२ हजार रुपयांच्या अवैध अग्निशस्त्रासह युवक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

21/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.