Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर न्यायालयाचा मोठा निकाल! वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसवणाऱ्या चालकाला दिली ‘ही’ शिक्षा

07/10/2026

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आव्हाड आणि जयंत पाटीलही चालतील पण महाराष्ट्रद्रोही सहन करू शकत नाही – उद्धव ठाकरे
निवडणूक

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आव्हाड आणि जयंत पाटीलही चालतील पण महाराष्ट्रद्रोही सहन करू शकत नाही – उद्धव ठाकरे

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआ आणि महायुतीच्या नेत्यांचा प्रचार जोरात सुरु आहेत. दोन्हीही बाजूंनी प्रचारासाठी बड्या नेत्यांची फौज मैदानात उतरलेली आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठे गौप्यस्फोट केले आहेत. यंदा पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये तीन आणि महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष मैदानात आहेत. त्यामुळे जागावाटपाचा मोठा तिढा निर्माण झाला आहे. असाच तिढा मुख्यमंत्रि‍पदाबद्दल होणार का असा प्रश्न निर्माण आहे. मविआचं जर सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण? असा सवाल उद्धव ठाकरे यांना वहिनीने केला असता उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट केली.

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा घोषित करावा असं आवाहन केलं होतं. मात्र अद्यापही मविआचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा ठरलेला नाही. दुसरीकडे शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये ज्या पक्षाचे जास्त आमदार येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल असं स्पष्ट केलं होतं. या दरम्यानच आता उद्धव ठाकरे यांनी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शरद पवार यांच्या भूमिकेला सहमती देत उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, मी स्वागत करेन आणि त्यापुढे जाऊन सांगेन की, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्यातल्या कुणाचंही नाव घोषित करावं मला फक्त महाराष्ट्रद्रोही नकोत.

उद्धव ठाकरे म्हणाले की, माझी इच्छा असणं किंवा नसण्यापेक्षा लोकांची इच्छा महत्वाची आहे. शिवसेनाप्रमुखांच्या मुलाशी यांनी गद्दारी केली. शिवसेना प्रमुखांमुळेच यांची आज पंचतारांकित शेती आहे. ही कुणाच्या जोरावर झाली? तुम्ही काय करु शकला असता आयुष्यात? तुम्हाला ज्यांनी सगळं दिलं, त्यांनाच भाजपने फसवलं म्हणून मी मुख्यमंत्रिपद स्वीकारलं होतं. आधी पाच वर्ष आम्ही जेव्हा भाजपसोबत होतो, तेव्हा याच टीकोजीरावांनी भरसभेत भाजप नको म्हणून राजीनामा दिला होता, असं उद्धव म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 465
उद्धव ठाकरे विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर न्यायालयाचा मोठा निकाल! वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसवणाऱ्या चालकाला दिली ‘ही’ शिक्षा

By Annant Ppangarkar07/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महामार्गावरून पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत निष्काळजीपणे कंटेनर घुसवून चार जणांना चिरडून…

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026

बुधवार, ०७ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

07/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.