Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पठार भागातील वाड्या-वस्त्यांवर पोहोचले वंचितचे उमेदवार अजीज वोहरा
निवडणूक

पठार भागातील वाड्या-वस्त्यांवर पोहोचले वंचितचे उमेदवार अजीज वोहरा

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – मोहसीन शेख

विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्याकडे जात आहे. यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रमुख उमेदवारांची मोठे दमछाक होत असताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजीज वोहरा मात्र वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले आहे. मतदारांच्या भेटीनंतर मतदार मतदानाच्या रूपाने त्यांच्या पाठीशी राहतील याबाबत त्यांना आशा आहेत.

प्रमुख उमेदवारांच्या तुलनेत आपल्या मर्यादित अशा प्रचार यंत्रणेचा प्रभावी वापर करण्यात ते यशस्वी ठरले आहे. प्रस्थापित आणि धनशक्ती विरोधात लढणारा सामान्य कुटुंबातील उमेदवार म्हणून अजीज वोहरा यांना मतदारांची पसंती मिळत असल्याचे ते म्हणाले. वाड्या वस्त्यांवर जात ते आपली भूमिका मतदारांना पटवून देत आहेत.

शहरातील मतदारांच्या गाठीभेटीनंतर वोहरा यांनी आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. बुधवारी त्यांनी मतदारसंघाच्या दक्षिण भागातील दौरा सुरू केला होता. संगमनेर तालुक्यातील देवगाव, शिरापूर, पिंपळगाव देपा येथे मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेताना चौका-चौकात त्यांचे स्वागत झाले. निवडक कार्यकर्त्यांसह ते दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पठार भागातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या साकुरमध्ये पोहचले होते. साकुरच्या बाजारतळावर त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.

कार्यकर्त्यांसमवेत प्रत्येक नागरिकास भेटून व थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेत मार्गक्रमण करीत असताना त्यांना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत होता. प्रत्येक नागरिकांची विचारपूस करीत त्यांच्या असंतोषास वाचा फोडीत अजिजभाईंनी त्यांना बोलते केले व वंचित, सोशितांची सत्ता आणण्याचा मानस त्यांनी यावेळी मतदारांशी बोलताना व्यक्त केला.

मविआ व महायुती दोन्हीही फक्त प्रस्थापितांचे हितसंबंध जपत असल्याचा पुनरुच्चार करत जनतेने आपल्या हक्क अधिकारांबाबत जागरूक होण्याचा सल्ला दिला. तसेच प्रत्येक वेळी एकच लोकप्रतिनिधी निवडून येणे ही लोकशाही नसून हुकूमशाही असल्याचा आरोप ही त्यांनी आपल्या भाषणादरम्यान केला. त्यांचा आक्रमक प्रचार युवकांना भुरळ पाडीत असल्याचा प्रचारात जाणवले. महायुती सरकारने जनतेचा व गोरगरीब महिलांचा अपमान केला आहे. लाडक्या बहिणीच्या नावावर दीड हजार रुपये देऊन गॅस, जीएसटी, बियाणे, खते, व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवून आवळा देऊन कोवळा काढण्याचा प्रकार केला आहे. जनतेचे गरजेचे प्रश्न सोडून आपापसात भांडणे लावण्याचा प्रकार हे महायुती सरकार करीत आहे “असा देखील आरोप आपल्या छोट्या सभांमधून त्यांनी प्रस्थापितांवर केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,140
Ajij अजीज व्होरा प्रचार सभा वंचित बहुजन आघाडी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महायुती व महाविकास आघाडीने शिवसेनेला विश्वासात न घेता निवडणूक बिनविरोध करण्याचे…

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.