Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पहिल्याच दिवशी संगमनेर विधानसभा मतदारसंघात १२२ ज्येष्ठ नागरिक मतदारांचे गृहमतदान, ९८ ज्येष्ठ नागरिक तर २४ दिव्यांग मतदारांचा समावेश… तीन दिवस चालणार प्रक्रिया
निवडणूक

पहिल्याच दिवशी संगमनेर विधानसभा मतदारसंघात १२२ ज्येष्ठ नागरिक मतदारांचे गृहमतदान, ९८ ज्येष्ठ नागरिक तर २४ दिव्यांग मतदारांचा समावेश… तीन दिवस चालणार प्रक्रिया

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/11/2024Updated:15/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, १४ नोव्हेंबर 

संगमनेर – प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. तत्पूर्वी संगमनेर विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी १२२ मतदारांनी आपले मतदान नोंदविले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली आहे.

गृह मतदान करणाऱ्यांमध्ये ८५ वर्षावरील ९८ जेष्ठ नागरिकांचा तर २४ दिव्यांग नागरिक मतदारांचा समावेश आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ८५ वर्षांवरील व दिव्यांग नागरिक जे मतदान केंद्रापर्यत पोहोचू शकत नाही अशा मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

यासाठी नमूना १२ डी भरून घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी गुरुवारी पहिल्याच दिवशी निवडणूक कामासाठी नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांनी घरोघर जात या मतदारांचे मतदान नोंदवून घेतले असून ते मतदान मतभेद बंद झाले आहे. मतमोजणी वेळी या मतदानाची मोजणी केली जाईल.

निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा समन्वय अधिकारी रामदास कोकरे, नायब तहसीलदार संदीप भांगरे, अनुप गिरी, गृह मतदान‌ प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.

तीन दिवस चालणार प्रक्रिया…

संगमनेर विधानसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी २५२ मतदारांनी नोंदणी केली आहे. १४ ते १६ नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत घरोघरी जाऊन निवडणूक कर्मचाऱ्यांकडून गृह मतदान नोंदवून घेतले जाणार आहे. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान‌ अधिकारी व‌ सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश असलेल्या १० पथकांच्या माध्यमातून गृह मतदान मोहीम राबविण्यात येत आहे. गृह‌ मतदानांसाठी टपाली मतपत्रिकेचा वापर करण्यात येत आहे. – शैलेश हिंगे, निवडणूक निर्णय अधिकारी, संगमनेर विधानसभा मतदारसंघ.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,146
गृह मतदान विधानसभा निवडणूक शैलेश हिंगे संगमनेर विधानसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महायुती व महाविकास आघाडीने शिवसेनेला विश्वासात न घेता निवडणूक बिनविरोध करण्याचे…

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.