Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » काँग्रेसशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिलेल्या बी. जे. खताळ पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ काँग्रेसमध्ये
निवडणूक

काँग्रेसशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिलेल्या बी. जे. खताळ पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ काँग्रेसमध्ये

खताळ यांच्या नातवाने भाजपाला राम राम करत शिर्डीत प्रियंका गांधींच्या सभेवेळी काँग्रेसमध्ये केला प्रवेश!
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 16, 2024Updated:November 16, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, १६ नोव्हेंबर

संगमनेर विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून ज्या माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांच्या नावाचा उल्लेख करून निवडणुकीतील भाषणांना आणि थोरात यांच्यावरील टिकेला सुरुवात केली जाते, त्या खताळ पाटलांचे नातू आणि भारतीय जनता पक्षाच्या एका सेलचे पदाधिकारी असलेले विक्रमसिंह खताळ यांनी शनिवारी शिर्डीमध्ये प्रियंका गांधींच्या प्रचार सभेवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

गेल्या काही वर्षांपासून विक्रमसिंह खताळ पाटील भारतीय जनता पक्षात सक्रिय होते. गेल्या वेळी तसेच यावेळी देखील खताळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक होते. मात्र दोन्ही वेळेला त्यांचा उमेदवारीचा पत्ता पक्षातील काही नेत्यांनी कापण्यात पुढाकार घेतला. एकीकडे खताळ पाटील यांच्या नावावर राजकारण करताना दुसरीकडे त्यांच्या नातवाला पक्षात डावले जात असल्याचे खाजगीत बोलले जात होते.

याही निवडणुकीत विक्रमसिंह खताळ यांच्या ऐवजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विखे समर्थक असलेल्या अमोल खताळ यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून दिल्यानंतर विक्रमसिंह खताळ नाराज असल्याचे बोलले जात होते. या नाराजीचा परिपाक शनिवारी शिर्डीत दिसून आला.

शनिवारी महाविकास आघाडीच्या शिर्डीतील उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी शिर्डीमध्ये आल्या होत्या. गांधी यांच्या सभेवेळी खताळ यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

राजस्थानच्या आमदार रिटा चौधरी यांनी खताळ आणि त्यांच्या पत्नीचे पक्षात स्वागत केले. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात आणि महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्यातील लढत अंतिम टप्प्यात आली असताना विक्रमसिंह खताळ यांनी भाजपाची सोडलेली साथ धक्कादायक मानली जात आहे.

या निवडणुकीत माजी मंत्री व काँग्रेस सोबत शेवटच्या क्षणापर्यंत एकनिष्ठ असलेले बी. जे. खताळ पाटील यांच्या नावाचा वापर महायुतीकडून सातत्याने केला जात असल्याचे दिसत होते. त्याच खताळ यांच्या नातवाने अखेर भाजपाची साथ सोडत काँग्रेसमध्ये जाण्याचा घेतलेला निर्णय निवडणुकीत महत्त्वाचा मानला जात आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,292
काँग्रेस पक्षप्रवेश भाजप विक्रमसिंह खताळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

भाजपची मोठी खेळी! प्रवेश करताच प्राजक्त तनपुरेंना अहिल्यानगरमधून विधानपरिषदेची उमेदवारी, भाजपच्या ११ उमेदवारांची घोषणा

June 1, 2026

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

May 25, 2026

रविवार विशेष लेख — पश्चिम बंगाल बंगालच्या विजयाचे मानकरी

May 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJune 10, 20260

आजचे राशीभविष्य ​मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामगिरीचे…

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.