Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रियंका गांधींनी मोदी-शहांना शिर्डीच्या भरसभेत दिले जातनिहाय जनगणना करण्याचे चॅलेंज
निवडणूक

प्रियंका गांधींनी मोदी-शहांना शिर्डीच्या भरसभेत दिले जातनिहाय जनगणना करण्याचे चॅलेंज

सभेला ५० हजारावर नागरिकांची उपस्थिती
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 16, 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

भाजप महायुतीमुळे महागाईचा दहशतवाद वाढला
खोटे बोलणाऱ्या महायुती सरकारला हद्दपार करा
प्रियंका गांधी यांचा भाजपसह महायुतीवर हल्लाबोल
शिर्डी /संगमनेर – प्रतिनिधी

भाजप व महायुती सरकारने सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला असून त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेण्याची पात्रता यांची नाही. महाराष्ट्रात तोडून फोडून आलेले हे सरकार जनतेला मान्य नाही. महाराष्ट्रातील युवक बेरोजगार करून अनेक उद्योग या सरकारने गुजरातला पळवले असून देशात व राज्यात महागाईचा दहशतवाद वाढला असल्याची टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली असून खोट्या बोलणाऱ्या महायुती सरकारला हद्दपार करा, असे आवाहन जनतेला केले आहे.

शिर्डी येथे शनिवारी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, श्रीरामपूरचे उमेदवार हेमंत ओगले, कोपरगावचे उमेदवार संदीप वर्पे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, सुहास वहाडणे, सहप्रभारी बी. एम. संदीप, आमदार रिटा चौधरी, तेलंगणाच्या मंत्री सीताक्का, सचिन गुजर, करण ससाने आदींसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रियंका गांधी म्हणाल्या, महाराष्ट्र ही संतांची आणि शिवरायांची भूमी आहे. मात्र शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान मोदी व भाजप सरकारने केला आहे. त्यांना महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे या भूमीमधील आहे. मोदी यांनी दिलेले आव्हान मी स्वीकारते आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेते. आता माझे चॅलेंज आहे की मोदी व भाजप सरकारने जातीनिहाय जनगणना करावी.

महाराष्ट्रात तोडून फोडून सरकार आले. संविधान धोक्यात आले आहे. येथील अनेक उद्योग गुजरातला नेले आहे. महिला सुरक्षित नाहीत. अशा सतत खोटे बोलणाऱ्या सरकारला जनतेने खाली खेचले पाहिजे. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये व राज्यात मोफत एसटी प्रवास मिळणार आहे. शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे.

याचबरोबर २५ लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे. सोयाबीनला सात हजार रुपये हमीभाव कांदा कापूस या सर्व पिकांना हमीभाव दिला जाणार आहे. काँग्रेस बोलते ते करते. भाजप सरकार सातत्याने खोटे बोलते. शिर्डी मतदार संघातही मोठा दहशतवाद असल्याने हा विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आमदार थोरात म्हणाले, राहाता मतदारसंघांमध्ये मोठी दहशत आहे. इथे विकास थांबलेला आहे. माझ खुल आव्हान आहे की एकदा संगमनेर शिर्डीच्या विकासावर समोरासमोर लाख दीड लाख लोकांसमोर एकाच व्यासपीठावर चर्चा होऊन जाऊ द्या.

घोगरे म्हणाल्या, मी शेतकऱ्याची मुलगी असल्याने या दहशती विरुद्ध आवाज उठवला आहे. आणि यामध्ये प्रियंका गांधींसह सर्व तालुका एकवटला आहे. शिर्डीमध्ये परिवर्तन नक्की असून सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे रहा.

सभेला प्रचंड मोठी गर्दी….

काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रथम आल्या. त्यांची सभा ऐकण्यासाठी सुमारे ५० हजारांच्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होते. यावेळी तरुणाईने केलेले स्वागत अभूतपूर्व होते. मोदींच्या टीकेला दिलेल्या उत्तराने भाजप-सेना युती बॅक फुटवर गेली आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 674
प्रचार सभा प्रियंका गांधी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

May 25, 2026

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला, आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा विजय

May 4, 2026

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी रणधुमाळी सुरू; १२ मे रोजी मतदान आणि निकाल, पाहा संपूर्ण वेळापत्रक!

April 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJune 10, 20260

आजचे राशीभविष्य ​मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामगिरीचे…

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.