Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खताळ आडनावाचा वापर करून गैरप्रकार करणे चुकीचे – विक्रमसिंह खताळ
राजकारण

खताळ आडनावाचा वापर करून गैरप्रकार करणे चुकीचे – विक्रमसिंह खताळ

पत्रकार परिषद
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 18, 2024Updated:November 18, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, १८ नोव्हेंबर

संगमनेर – बी. जे. खताळ पाटील यांचे सुसंस्कृत राजकारण व समाजकारण संपूर्ण राज्याला परिचित आहे. मात्र या आडनावाचा वापर करून समोरील व्यक्ती प्रशासनावर दबाव निर्माण करत आहे. पालकमंत्र्याच्या माध्यमातून त्यांच्याकडून होत असलेली सेटलमेंट हा काय प्रकार सुरू आहे अशी टीका करताना भाजपकडून तालुक्यात सुरू झालेला धाक व दडपशाही प्रकार निंदनीय असल्याची टीका भाजपच्या आयटी सेलचे सहसंयोजक व नुकताच भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या विक्रमसिंह खताळ यांनी केली आहे.

हॉटेल सेलिब्रेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समवेत पत्नी शिवांगी खताळ होत्या.

विक्रमसिंह खताळ म्हणाले, महसूलच्या अनेक कामांची बंदी असताना एका विशिष्ट कुटुंबासाठी नियम शिथिल करणे. महसूल अधिकारी यांच्यावर सातत्याने दबाव टाकणे. जमिनीचे व्यवहार, तलाठी भरतीमध्ये अनेकांकडून पैसे घेतले मात्र ते परतही केले गेले नाही. असे अनेक उद्योग फक्त खताळ आडनाव वापरून या मंडळीने केले आहे. हे दुर्दैवी आहे.

संगमनेर तालुका हा शांत व सुसंस्कृत विचारांचा आहे. मात्र येथे आता भाजपकडून दडपशाही निर्माण केली जात आहे. खताळ दादांचा विचार हा काँग्रेसचा विचार होता. मात्र समोरच्या उमेदवार हा दर सहा महिन्याला पक्ष आणि विचार बदलत आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार.

त्यांचे अनेक गैरप्रकार आहेत. ते सर्व माध्यमांनी बाहेर काढावे. कोण खरा आहे कोण खोटा आहे हे सर्वांना माहिती आहे. भाजपाची व्यक्तिगत टीका करणारे राजकारण आणि दडपशाहीचे राजकारण आपल्याला आवडत नाही. असे सांगताना यापुढील काळात आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार असून ते जी जबाबदारी देतील ते आपण पार पाडणार आहोत.

धांदरफळ गट आणि तालुक्यातील जनता यांच्यामध्ये धांदरफळ घटनेमुळे तीव्र संताप निर्माण झाला. या घटनेमुळे मी वसंत देशमुख यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पुढे बोलतच राहिले. पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा सन्मानच झाला पाहिजे आणि ती परंपरा थोरात आणि खताळ परिवाराने नेहमी जपली आहे.

मात्र भाजप महायुतीकडून इतक्या खालच्या पातळीचे राजकारण जर कोणी करत असेल तर ती आपली संस्कृती नाही. आणि त्यामुळे मी धांदरफळ घटनेचा निषेध करतोच. मात्र त्यांना समर्थन करणाऱ्या जेवढ्या प्रवृत्ती आहे, त्यांचाही निषेध करतो. विकासाच्या वाटचालीमध्ये सर्वांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचे असल्याचे ते म्हणाले.

मागील अडीच वर्षात सत्ता आल्यानंतर महायुतीच्या माध्यमातून त्यांचे तालुक्यातील गैरप्रकार यांचे अनेक किस्से आहेत. यामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. खंडणीखोरीचे काम कोणी करत असेल तर ते चुकीचे असून या चुकीच्या कामांना आमचा कधीही पाठिंबा नाही असे ते म्हणाले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,179
विक्रमसिंह खताळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJune 10, 20260

आजचे राशीभविष्य ​मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामगिरीचे…

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.