Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026

रविवार विशेष लेख — हट्टी मोदींचे गर्वहरण!

July 26, 2026

आज, रविवार २६ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 26, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापूर्वीच २४९४ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
निवडणूक

अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापूर्वीच २४९४ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या देखरेखीखाली गृह मतदान प्रक्रिया
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 18, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

२४३८ ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांचे गृह मतदान तर ५६ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान 
८५ वर्षांवरील २१०६ ज्येष्ठ नागरिक, ३३२ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान 
सोमवार, १८ नोव्हेंबर 
अहिल्यानगर – जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात तीन दिवस गृह मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आली. यात २४३८ ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांचे गृह मतदान तर ५६ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ८५ वर्षांवरील आणि मतदान केंद्रापर्यत पोहोचू न शकणाऱ्या दिव्यांग मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती.

यासाठी नमूना १२ डी भरून घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत तर अहमदनगर शहर मतदारसंघात ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी गृह मतदान प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यात अकोले विधानसभा मतदारसंघात २२६ ज्येष्ठ नागरिक, २६ दिव्यांग असे एकूण २५२ मतदारांनी गृह मतदान केले.

संगमनेर मतदारसंघात १९९ ज्येष्ठ नागरिक, ३४ दिव्यांग असे एकूण २३३, शिर्डी मतदारसंघात १७५ ज्येष्ठ नागरिक, १७ दिव्यांग असे एकूण १९२, कोपरगाव मतदारसंघात १६९ ज्येष्ठ नागरिक, ३३ दिव्यांग असे एकूण २०२, श्रीरामपूर मतदारसंघात १०६ ज्येष्ठ नागरिक, २० दिव्यांग असे एकूण १२६ मतदारांनी गृह मतदान केले. नेवासा मतदारसंघात १५८ ज्येष्ठ नागरिक, २५ दिव्यांग असे एकूण १८३, शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात १७७ ज्येष्ठ नागरिक, ४८ दिव्यांग असे एकूण २२५ मतदारांचा समावेश आहे.

राहूरी मतदारसंघात ११७ ज्येष्ठ नागरिक, २२ दिव्यांग असे एकूण १३९, पारनेर मतदारसंघात १४५ ज्येष्ठ नागरिक, २० दिव्यांग असे एकूण १६५, श्रीगोंदा मतदारसंघात २४८ ज्येष्ठ नागरिक, ४५ दिव्यांग असे एकूण २९३, कर्जत – जामखेड मतदारसंघात २६४ ज्येष्ठ नागरिक, ३० दिव्यांग असे एकूण २९४ मतदारांनी गृह मतदान केले.

अहमदनगर शहर मतदारसंघात १२२ ज्येष्ठ नागरिक, १२ दिव्यांग असे१३४ मतदारांनी गृह मतदान केले आहे. या मोहीमेत अत्यावश्यक सेवेतील ५६ कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान सुविधेचा लाभ घेतला आहे. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश असलेल्या पथकांच्या माध्यमातून गृह मतदान मोहीम राबविण्यात आली.

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, बाळासाहेब कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या देखरेखीखाली गृह मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 509
गृह मतदान विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

May 25, 2026

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला, आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा विजय

May 4, 2026

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी रणधुमाळी सुरू; १२ मे रोजी मतदान आणि निकाल, पाहा संपूर्ण वेळापत्रक!

April 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

By अनंत पांगारकरJuly 26, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झालेल्या प्रत्येक लढाईमध्ये भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य…

रविवार विशेष लेख — हट्टी मोदींचे गर्वहरण!

July 26, 2026

आज, रविवार २६ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 26, 2026

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.