Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बटेंगे तो कटेंगे प्रचाराने भाजप पुरता बॅकफूटवर, लाडकी बहीण योजना कामी येण्याची शक्यता मालवली
निवडणूक

बटेंगे तो कटेंगे प्रचाराने भाजप पुरता बॅकफूटवर, लाडकी बहीण योजना कामी येण्याची शक्यता मालवली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर 'भटकती आत्मा' आणि 'उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचे 'नकली संतान' अशी टीका केली होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/11/2024Updated:18/11/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

राज्यातील विधानसभा निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ ही योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरणार अशी शक्यता असतानाच ‘बटेंगे तो कटेंगे’ या योगी आदित्यनाथ यांच्या नाऱ्याने वातावरण निर्मितीत महायुती मागे पडल्याचं चित्र निर्माण झालं आहे. ‘लाडकी बहीण’मुळे निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती ‘बटेंगे तो कटेंगे’ या प्रचारामुळं पुरती रसातळाला गेल्याचं दिसू लागलं आहे. याचा फटका निवडणुकीत महायुतीला बसू शकतो, असे अंदाज बाहेर येऊ लागले आहेत.

मे 2024 मध्ये देशभरात लोकसभा निवडणुका पार पडल्या. त्या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. यावेळी महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर ‘भटकती आत्मा’ आणि ‘उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचे ‘नकली संतान’ अशी टीका केली होती. तर लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी भाजपा संविधान बदलणार, असा प्रचार केला होता. याचा फायदा महाविकास आघाडीला निवडणुकीत दिसून आला. मात्र लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत नको, यासाठी महायुतीने अधिक सावधगिरी आणि खबरदारी बाळगली होती. यात प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ते यशस्वीही झाले.

मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात येऊन ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिला आणि तिथेच चित्र बदलल्याचं दिसून आलं. महायुतीने आपल्या बाजूंनी जी वातावरणनिर्मिती केली होती ती एका ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेने फसली. केंद्रातील अनेक नेते महाराष्ट्रात येऊन प्रचार करीत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ चा नारा दिला. याचा कित्ता राज्यातील भाजपा नेत्यांनी गिरवला. जनतेला हे पटलेलं दिसत नाहीय, यावरून लोकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

भाजपा समाजात जाती आणि धार्मिक तेढ निर्माण करीत आहे, अशी धारणा लोकांची होत चालली आहे. जाती, धर्माशिवाय भाजपा निवडणूक लढवू शकत नाही का? असं जनसामान्यांना वाटतंय. या सर्वांचा परिणाम म्हणून ‘बटेंगे तो कटेंगे’ यामुळं महायुतीला विधानसभा निवडणुकीत फटका बसेल, असं सांगितलं जातं.

एकीकडे महायुतीने ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिलाय. हा नारा म्हणजे हिंदूंनी एकत्र व्हावं. एकत्र राहावं आणि या नाऱ्यातून अप्रत्यक्षरीत्या मुस्लिम मतदारांना डिवचण्याचा प्रयत्न केला गेलाय. परंतु दुसरीकडे महायुतीतच ‘बटेंगे तो कटेंगे’ या प्रचारातील घोषणेवरून त्यांच्यातच एकवाक्यता किंवा समन्वय दिसून येत नसल्याचं चित्र होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ याला विरोध केलाय. भाजप आमदार पंकजा मुंडे यांनीही ‘बटेंगे तो कटेंगे’ हा चुकीचा प्रचार असल्याचं म्हटलं. आपण याचं समर्थन करत नसल्याचं मुंडेंना म्हटलंय.

दरम्यान, अजित पवार किंवा अशोक चव्हाण हे बाहेरून आलेले आहेत, मात्र पंकजा मुंडे ह्या मूळ भाजपातील आहेत आणि त्यांनीच ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध केल्यामुळं महायुतीतच एकवाक्यता किंवा त्यांच्यात मतभिन्नता दिसून येत आहे. दरम्यान, ‘बटेंगे तो कटेंगे’ या प्रचारावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना आता सारवासारव करावी लागत असल्याचं दिसून येतंय.

एकूणच ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा भाजपाच्याच अंगाशी येत असल्याचं चित्र आहे. सुरुवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिल्यानंतर वोट जिहादवरून धर्मयुद्धाची भाषा करणारे देवेंद्र फडणवीसांनादेखील लक्ष्य केलं जातंय. परिणामी महायुती आणि मुख्यत: भाजपा कुठेतरी बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. ‘बटेंगे तो कटेंगे’ वरून भाजपावर सर्व बाजूंनी टीकास्त्र डागलं जात असल्याचं पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याचा उच्चार सभेत टाळला. परिणामी आपल्यावर टीका होत आहे हे लक्षात आल्यामुळं भाजपाने घूमजाव केलंय.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 952
भाजप महायुती विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महायुतीत बंडखोरीची चिन्हे; शिवसेनेचं डोकं उडवण्याचं काम भाजप करत आहे: अब्दुल सत्तार यांच्या आरोपाने महायुतीत खळबळ

01/06/2026

भाजपची मोठी खेळी! प्रवेश करताच प्राजक्त तनपुरेंना अहिल्यानगरमधून विधानपरिषदेची उमेदवारी, भाजपच्या ११ उमेदवारांची घोषणा

01/06/2026

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

25/05/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.