Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » श्रीरामपूरमध्ये शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर गोळीबार, कांबळे बचावले
गुन्हेगारी

श्रीरामपूरमध्ये शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर गोळीबार, कांबळे बचावले

जिल्ह्यात खळबळ
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 20, 2024Updated:November 20, 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार २० नोव्हेंबर 

श्रीरामपूर – शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच अहिल्या नगर जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेऊन परतत असताना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडल्याचा प्रकार समोर आला आहे.

कांबळे यांचे वाहन भरधाव वेगात असल्याने आणि हल्लेखोरांचा निशाणा चुकल्याने झाडलेल्या गोळ्या त्यांच्या वाहनाजवळून हवेत निघून गेल्या. या संदर्भात मंगळवारी रात्री कांबळे यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मंगळवारी १९ नोव्हेंबर मध्यरात्री गोळीबाराचा हा प्रकार अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेट समोर झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांकडून हा प्रकार झाल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

श्रीरामपूरमध्ये राज्यातील महत्त्वाची लढत होत आहे. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली आहे. काँग्रेसचे तत्कालीन आमदार लहू कानडे यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मिळविली. तर काँग्रेस कडून या मतदार संघात हेमंत ओगले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर या मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे निवडणूक लढवत आहे.

काय आहे नेमकी घटना….

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भाऊसाहेब कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १९ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास डॉ. संजय फरगडे, जनार्धन गालपगारे यांच्यासह मातापुर येथे माझे कार्यकर्ते संजय लबडे यांच्या बोलेरो गाडी (एम. एच. १७ सी.एम.७१९१) मध्ये ड्रायव्हर चेतन तनपुरे यांचेसह मतदार संघात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गेलो होतो. तेथे पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटुन आम्ही चौघे बोलेरो गाडीत बसुन मध्यरात्री एक वाजण्याच्या दरम्यान श्रीरामपूर कडे परतत असताना गाडीमध्ये चालकाच्या शेजारील सिटवर बसलेलो होतो. त्यावेळी प्रवास करत असतांना माझ्या लक्षात आले की, दोन मोटारसायकलवरील लोक आमचा पाठलाग करत आहेत. त्याबाबत मी माझ्यासोबतच्या लोकांना सांगितले. 

काही अंतर गेल्यानंतर रस्त्यात अशोक सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य गेट जवळ आल्यानंतर संरक्षणासाठी कारखान्याच्या गेटमधुन गाडी आत घेण्यास मी चालकाला सांगितले. चालकाने गाडी गेटकडे वळविली परंतु त्यावेळी कारखान्याचे गेट अर्धवट बंद होते. त्यामुळे आमची गाडी आत जावु शकली नाही, म्हणुन चालकाने गाडी उभी केली.

त्यादरम्यान पाठलाग करणाऱ्या दोन मोटारसायकलवरील व्यक्तिनी त्यांच्या मोटारसायकल रोडच्या बाजुला उभ्या करुन अंदाजे २० ते २५ वयोगटातील तिघेजण गाडीच्या दिशेने चालत त्यामुळे मी चालकाला गाडी पुन्हा मागे घेत श्रीरामपूरच्या दिशेने घेण्यास सांगितले. चालक तनपुरे गाडी मागे घेत असतांना गाडीच्या समोरील तिघांपैकी सडपातळ बांध्याच्या एका व्यक्तिने त्याचे कमरेतुन पिस्टल काढुन आमच्या गाडीच्या दिशेन फायर केली. परंतु आमची गाडी वेगात मागे असल्याने ती गोळी गाडीला न लागता हवेत गेली. त्यानंतर आम्ही गाडी वेगात चालवुन श्रीरामपुरच्या दिशेने निघालो. 

श्रीरामपुरमध्ये येवुन आम्ही माझे मित्र प्रकाश चित्ते यांच्या घरी गेलो. व त्यानंतर घडल्या प्रकाराबाबत कांबळे यांनी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला येत दिलेल्या फिर्यादीवरून तीन अज्ञात व्यक्तिविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,836
गोळीबार भाऊसाहेब कांबळे शिवसेना शिंदे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

By अनंत पांगारकरJuly 25, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, आळेफाटा: हातात प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या आणि पोती धरून कचरा गोळा करण्याचा…

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.