Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धक्कादायक… निवडणूक कामासाठी वापरल्या गेलेल्या एसटी बसमध्ये सापडले हजारो रुपये, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावची घटना
महाराष्ट्र संवाद विशेष

धक्कादायक… निवडणूक कामासाठी वापरल्या गेलेल्या एसटी बसमध्ये सापडले हजारो रुपये, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावची घटना

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, २२ नोव्हेंबर – अहिल्यानगर 

बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या शनिवारी लागत आहे. दरम्यान या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांनी पैशाचा वापर केल्याचे समोर येऊ लागले आहे. निवडणूक कामासाठी नेमलेल्या भरारी पथकांनी देखील कोट्यावधी रुपये, सोन्याचे दागिने पकडले असतानाच आता अहिल्यानगर जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

निवडणूक कामासाठी वापरलेल्या एसटी बस मध्ये दुसऱ्या दिवशी प्रवाशांना बसच्या सीट खाली पाचशे रुपयांचे दोन नोटांचे बंडल आढळून आले. नोटांच्या मोजणीनंतर तब्बल ८६ हजाराची रोकड असल्याचे समोर आले असून यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव एसटी आगाराच्या कोपरगाव-वैजापूर-कोपरगाव आशा फेऱ्या मारणाऱ्या एसटी बसमध्ये सीटखाली प्रवाशाला पाचशे रुपयांच्या नोटांची दोन बंडल आढळून आले. बसमधून प्रवास करणाऱ्या युवकाने प्रामाणिकपणा दाखवत नोटांची ही बंडल वाहकाकडे दिली. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी एसटी बसमध्ये ही मोठी रक्कम आढळून आल्याने या संदर्भात तपास करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणी उलट सुलट चर्चेला देखील उधान आले आहे.

तसेच, ही रक्कम नेमकी कोणाची आहे, कोणत्या कामासाठी ही रक्कम बसमधून नेण्यात येत होती, याचाही तपास करण्यात येणार आहे.

नेमकं काय घडलं?

मतदानच्या एक दिवस अगोदर, दोन दिवसांपूर्वी ही बस स्ट्रॉग रुमपासून ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना घेऊन मतदान केंद्रावर गेली होती. त्यानंतर काल या बसने कोपरगाव -वैजापूर-कोपरगाव अशा फेऱ्या केल्या आहेत. काल सायंकाळी कोपरगावहून धामोरीकडे जात असताना बसमधील एका विद्यार्थी युवकाला शेवटच्या सीटखाली नोटांचे दोन बंडल सापडले आहेत. या दोन्ही बंडलमधील नोटांची बेरीज केली असता तब्बल ८६ हजारांची रोख रक्कम सापडल्याचे पाहायला मिळत आहे. एव्हढी मोठी रक्कम नेमकी कुणाची आणि बसच्या सीटखाली कशी आली? याबाबत पोलीस तपासात सर्वगोष्टी निष्पन्न होतील. सध्या बसमधील वाहकाकडून ही रक्कम संबंधित तपास यंत्रणेकडे देण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,043
रोकड सापडली
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

By Annant Ppangarkar07/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महात्मा गांधी हे खऱ्या अर्थाने देश व समाज समजलेले नेते होते.…

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026

संगमनेर न्यायालयाचा मोठा निकाल! वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसवणाऱ्या चालकाला दिली ‘ही’ शिक्षा

07/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.