Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीमुळे शिंदे-फडणवीस यांच्यात वाढती दरी, शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री!
राजकारण

मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीमुळे शिंदे-फडणवीस यांच्यात वाढती दरी, शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री!

मुख्यमंत्र्यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

प्रवीण पुरो | मुंबई

राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या अपेक्षेने विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील दुरावा वाढू लागला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे.

यांच्याकडे सोपविला राजीनामा – राजभवनात जाऊन एकनाथ शिंदेंनी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला. यावेळी या दोघांमधील दरी स्पष्ट दिसत होती. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर, दादा भुसे उपस्थित होते. पण शिंदे आणि फडणवीस यांच्यातील दुराव्याचं दर्शन झालं.

शिंदेच काळजीवाहू मुख्यमंत्री – विधानसभेचा कार्यकाळ आज संपल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत एकनाथ शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचं पत्र त्यांना सुपूर्द केलं. शपथविधीपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची राज्यपालांची एकनाथ शिंदेंना सूचना केली आहे.

पवार फडणवीसांमध्ये चर्चा – एकनाथ शिंदे राजीनामा देण्यासाठी दाखल होण्याआधीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राजभवनात पोहचले होते. यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र बसून चर्चा करत होते. एकनाथ शिंदे राजभवनात दाखल होताच अजित पवारांनी आपल्या खुर्चीवरुन उठत देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसवले. देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या बाजूला बसत होते. मात्र अजित पवार स्वत: बाजूला झाले आणि देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसण्यासाठी जागा दिली. यावरूनच शिंदे आणि फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रिपदावरुन दुरावा झाल्याची चर्चा रंगली होती आणि याचदरम्यान एकनाथ शिंदेंच्या बाजूला देवेंद्र फडणवीसांना बसवून अजित पवारांनी योग्य टायमिंग साधल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दोन्ही नेत्यात दुरावा – मुंबईतील अतिरेकी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली करण्याच्या शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. मात्र या कार्यक्रमा दरम्यानही, या दोन्ही नेत्यांत काहीसा दुरावा असल्याचं दिसलं. या कार्यक्रमातील दृश्य पाहून हे दोन्ही नेते एकमेकांना टाळत असल्याचं बोललं जात होतं.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,359
अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राजीनामा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar15/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्याने…

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.