बुधवार, २७ नोव्हेंबर – मुंबई
निवडणूक आयोगाने आचारसंहिता समाप्तीची घोषणा करतात सरकारने पुन्हा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेल्या रश्मी शुक्ला यांची सोमवारी संध्याकाळी नियुक्ती केली. शुक्ला यांनीआपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. शुक्ला आता पुन्हा एकदा राज्याच्या पोलिस महासंचालक (डीजीपी) असतील.
राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने केलेल्या मागणीनंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शुक्ला यांना पदावरून हटवत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यांच्या जागी संजय कुमार वर्मा यांनी राज्याचे सर्वोच्च पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता.

निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सोमवारी आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याचे जाहीर झाल्यानंतर गृह विभागाने लगेचच शुक्ला यांचा सक्तीच्या रजेचा कालावधी संपवत त्यांना पुन्हा काम करण्यास सांगितले. त्यानंतर शुक्ला यांनी पदभार घेतला आहे.


