गुरुवार २८ नोव्हेंबर – अहिल्यानगर
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शुक्रवारपासून अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शस्त्र व जमावबंदी आदेश लागू केले आहे. जिल्ह्यात सर्वत्र आदेश लागू – मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये २९ नोव्हेंबरपासून १२ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्र हे आदेश लागू करण्यात आले आहे.
यांना वगळले – जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्नाच्या मिरवणुका, प्रेतयात्रेच्या जमावास, याशिवाय पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यासह परवानगी घेतलेल्या मिरवणुकांना हे आदेश लागू राहणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
आदेशाचा भंग केल्यास कारवाई – उर्वरित सर्व ठिकाणी हे आदेश लागू असून या आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.