Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एकनाथ शिंदे यांच्या गृहमंत्रीपदाच्या मागणीला विरोध करणाऱ्या भाजपकडून आता शिंदेंच्या या चार संभाव्य मंत्र्यांच्या नावांनाही विरोध, शिंदे समोरील अडचणी वाढल्या
राजकारण

एकनाथ शिंदे यांच्या गृहमंत्रीपदाच्या मागणीला विरोध करणाऱ्या भाजपकडून आता शिंदेंच्या या चार संभाव्य मंत्र्यांच्या नावांनाही विरोध, शिंदे समोरील अडचणी वाढल्या

यांना मंत्रिमंडळात संधी नको - भाजप
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, ३० नोव्हेंबर – मुंबई 

राज्यात महायुतीसाठी स्पष्ट बहुमत मिळून आठवडा उलटला आहे तरी देखील नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झालेला नाही. यामुळे महायुतीत मोठ्या प्रमाणात धूसपुस सुरू असल्याचे समोर येत आहे. गृहमंत्रीपदावर आडून असलेल्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य चार मंत्र्यांच्या नावाला आता भाजपने विरोध केल्याचे समोर येत आहे. शिंदे गटाकडून कोणाला संधी द्यायची याचा निर्णय देखील भाजपच घेत असल्याचे समोर आल्याने शिंदे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

फडणवीसच मुख्यमंत्री – महायुतीचे मुख्यमंत्रीपद कोणाच्या गळ्यात पडणार? यावरून सत्तेवर येणाऱ्या महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच दिसत आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीतून होणार असला तरी या पदावर कोणाची नेमणूक करायची याचा पेच आठ दिवसानंतरही कायम आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळतील असे संकेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आले आहेत.

शिंदेंचा बारा मंत्रीपदावर दावा – दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी माघार घेत मुख्यमंत्रि‍पदासाठी भाजपचा मार्ग मोकळा केला असला तरी ते नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्याच्या गृहखात्यासह १२ मंत्रि‍पदांची मागणी केली आहे. मात्र आता शिंदे गटाच्या ४ मंत्र्यांच्या समावेशाला भाजपने आक्षेप घेतल्याची माहिती आहे.

या चार नावांना विरोध – शिंदेंच्या शिवसेनेतील अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत, संजय राठोड या चार नेत्यांच्या नावाला भाजपचा आक्षेप आहे. या चारही मंत्र्यांनी केलेल्या कारभारावरून भाजपमध्ये नाराजी असल्याचे समजते.

शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष – शिंदे यांनी त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांना अजूनपर्यंत नाराज केलेले नाही. त्यामुळे आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय निर्णय घेणार? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,530
अब्दुल सत्तार एकनाथ शिंदे तानाजी सावंत दीपक केसरकर देवेंद्र फडणवीस संजय राठोड
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.