Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी घेत ९४ वर्षाच्या योद्धाने आत्मक्लेष आंदोलन थांबविले, राज्यघटना आणि लोकशाहीच्या सुरू असलेल्या थट्टे विरोधात आत्मक्लेष!
आंदोलन

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी घेत ९४ वर्षाच्या योद्धाने आत्मक्लेष आंदोलन थांबविले, राज्यघटना आणि लोकशाहीच्या सुरू असलेल्या थट्टे विरोधात आत्मक्लेष!

बाबा आढाव हे ९४ वर्षाचे आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार ३० नोव्हेंबर – पुणे 

राज्यघटना आणि लोकशाहीच्या सुरू असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी, निवडणुकांचा संदर्भ देऊन बाबा लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात असल्याच्या निषेर्धार्थ ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी गुरुवारी आत्मक्लेष उपोषण सुरू केले होते.

ठाकरेंनी सोडले आढावांचे उपोषण – महात्मा फुले वाडा येथे सुरू असलेल्या या आत्मक्लेष आंदोलनावेळी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सकाळी आढाव यांची भेट घेतली. त्या पाठोपाठ सायंकाळी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आढाव यांची भेट घेत केलेल्या विनंतीनंतर ठाकरेंच्या हस्ते पाणी पिऊन आढाव यांनी आपले आत्मक्लेष आंदोलन मागे घेतले आहे. बाबा आढाव हे ९४ वर्षाचे आहेत.

यांची उपस्थिती – ठाकरे यांच्यासोबत यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, सुषमा अंधारे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्यासह अनेक राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.

बाबा आढाव म्हणाले, ‘देश स्वतंत्र झाल्यानंतर १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून प्रत्येक निवडणूक पाहत आलो. बराच काळ त्याचा भागही होतो. पण, आता सुरू असलेला भ्रष्टाचार याआधी कधीही पाहिला नाही, निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचारच आहे. मात्र, यावर आयोगाने आक्षेप घेतला नाही, जे अनाकलनीय आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी रुपयांचे वाटप करण्यात आले. निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईत शेकडो कोटींची रक्कम जप्त करण्यात आली, ही देशाच्या दृष्टीने अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे’, असे उपोषण सुरू करण्यापूर्वी आढाव म्हणाले होते. याशिवाय, लोकसभा आणि विधानसभेच्या निकालात इतका फरक कसा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मतदानात काहीतरी गडबड असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

ईव्हीएमच्या मतांमध्ये फरक, पण पुरावे नाहीत

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या मतांमध्ये फरक आहे, पण त्यासंदर्भातील कोणतेही पुरावे आमच्याकडे नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. हे पहिल्यांदाच घडले आहे, देशात झालेल्या निवडणुकांमुळे लोक खूप अस्वस्थ झाले आहेत, लोकांमध्ये निराशा आहे. दररोज सकाळी ११ वाजता विरोधी पक्षनेते संसदेत प्रश्न उपस्थित करतात. त्यांनी आपले म्हणणे मांडले पण त्यांच्या मागण्या संसदेत मान्य होत नाहीत आणि याचा अर्थ संसदीय लोकशाहीचे योग्य प्रकारे पालन होत नसल्याचा स्पष्ट अर्थ होतो. हे असेच सुरू राहिले तर लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडेल. त्यासाठी जनतेत जाऊन त्यांना जागरूक करावे लागेल. – शरद पवार

हा आत्मक्लेष अख्या महाराष्ट्राचा – “मला असं वाटतंय की मुद्दाम आम्ही करतोय ते बरोबर करतोय हे सांगणारं कोणीतरी वडिलधारं असावं लागतं. ते काम तुम्ही केलंय. पण आता तुम्ही आत्मक्लेश करू नका. हा आत्मक्लेश अख्ख्या महाराष्ट्राचा आहे”. – उद्धव ठाकरे

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,152
अजित पवार उद्धव ठाकरे बाबा आढाव शरद पवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

By Annant Ppangarkar07/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महात्मा गांधी हे खऱ्या अर्थाने देश व समाज समजलेले नेते होते.…

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026

संगमनेर न्यायालयाचा मोठा निकाल! वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसवणाऱ्या चालकाला दिली ‘ही’ शिक्षा

07/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.