Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेर ठरलं… मुख्यमंत्री भाजपचाच, देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब, गुरुवारी आझाद मैदानावर शपथविधी
राजकारण

अखेर ठरलं… मुख्यमंत्री भाजपचाच, देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब, गुरुवारी आझाद मैदानावर शपथविधी

शपथविधीची जोरदार तयारी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार ४ डिसेंबर – मुंबई 

केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रूपानी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर अखेर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भाजपाच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला असून भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिल.

सत्ता स्थापनेचा तिढा सुटला – राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होणार आहे. केंद्रीय निरीक्षकांसोबत झालेल्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर उर्वरित भाजपाच्या आमदारांनी फडणवीसांच्या नावाला अनुमोदन दिलं. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे.

महायुती सरकारचा शपथविधी उद्या – महायुती सरकारचा शपथविधी येत्या ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानात पार पडणार आहे. त्यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून, शपथविधी समारंभ वेळी पहिल्या रांगेत पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची आसन व्यवस्था असेल. तर मागे एका बाजूला मंत्री, तर दुसऱ्या बाजूला काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर समोर सुमारे २५ हजार लोकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महायुतीला सत्तेवर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांसाठी शपथविधीच्या ठिकाणी ‘लाडकी बहीण कक्ष’ उभारण्यात येणार असून, तेथे १० हजार महिलांची व्यवस्था केली जाणार आहे.

नेता निवडीची औपचारिकता – २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीला निर्वावद बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं. बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झालं होतं. परंतु, मुख्यमंत्री पदावरून अडलं होतं. एकनाथ शिंदेंही मुख्यमंत्री पदासाठी अडून बसल्याची चर्चा होती. त्यामुळे हा तिढा कधी संपणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. दुसरीकडे भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं होतं. त्यांच्या नावाची घोषणा करणेच बाकी होते. दरम्यान, आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेता निवडीची औपचारिकता पार पाडली.

देवेंद्र फडणवीसांनी मानले आभार – ‘एका कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर तीन वेळा मोदींनी बसवलं. अर्थात, एकदा ७२ तासांसाठीच होतो. पण तरीही तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री होतो. त्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसण्याचा मान मोदींनी दिला. हा पक्ष त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला. त्यातूनच सामान्य कार्यकर्त्याला वेगवेगळी पदं मिळाली, काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी मोदींचे आभार मानतो. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही आभार मानतो’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 999
देवेंद्र फडणवीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित…

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.