Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थोरात यांच्या प्रयत्नातूनच पठार भागातील आदिवासी वाड्यांना पाणी, ज्यांना गाव माहित नाही अशा नवीन आमदाराचा काय संबंध – सरपंच सुप्रिया मिसाळ
राजकारण

थोरात यांच्या प्रयत्नातूनच पठार भागातील आदिवासी वाड्यांना पाणी, ज्यांना गाव माहित नाही अशा नवीन आमदाराचा काय संबंध – सरपंच सुप्रिया मिसाळ

बातम्यांच्या माध्यमातून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/12/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, ०७ डिसेंबर – संगमनेर
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार मधील गिर्हेवाडी, सुतारवाडी, पायरवाडी येथील ग्रामस्थांना पिण्याचे चांगले पाणी मिळावे यासाठी व त्यातील अडचणी लक्षात घेत तत्कालीन लोकप्रतिनिधी बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला सूचना दिल्याने या वाड्या-वस्त्यांवर पिण्याचे पाणी मिळू लागले आहे. मात्र ज्यांना अद्यापही गाव आणि वाडी ही माहित नाही असे नवनिर्वाचित आमदार बातम्या देऊन जनतेत संभ्रम निर्माण करत आहे, अशी टीका हिवरगाव पठारच्या सरपंच सुप्रिया मिसाळ यांनी केली आहे.
सरपंच सुप्रिया मिसाळ आणि उपसरपंच दत्तात्रेय वनवे म्हणाले, पठार भागातील अनेक वाड्या-वस्त्यांच्या विकासासाठी तत्कालीन लोकप्रतिनिधी बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने निधी उपलब्ध करून दिला आहे. वाड्या-वस्त्यांवर पिण्याचे पाणी, रस्ते, वीज आदी सुविधांसोबत ग्रामस्थांच्या चांगल्या जीवनमानासाठी थोरात यांनी सदैव काम केले आहे. मात्र आमच्या गावातील वाड्यांना नवनिर्वाचित आमदारांनी पाणी मिळवून दिले अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. ज्या व्यक्तीला अजून आमचे गाव माहित नाही, वाड्या माहिती नाही त्याने काय केले हा मोठा प्रश्न आहे.
थोरात यांच्या माध्यमातून पाणी – थोरात यांनी या भागात विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे केली आहे. थेट सुतारवाडी पर्यंत उंच भागावर पाणी पोहोचविण्यासाठी त्यांनी काम केले. मात्र विद्युत पंपात बिघाड झाल्याने काही दिवस पाणी पुरवठा करता येत नसल्याने यासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांसह आम्ही थोरात यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर याची दखल घेत थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयाने व संबंधित यंत्रणेने पाठपुरावा केल्याने विद्युत पंप सुरू झाला आणि पाणी देता येऊ लागले.
पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश – थोरात यांच्या सूचनेवरून उपसरपंच दत्तात्रय वनवे, ग्रामसेवक विजय आहेर, रामदास गोंदके, सोपान डोळझाके, भाऊसाहेब नागरे, प्रकाश मिसाळ, बाळू दुधवडे, भाऊसाहेब पवार आदींनी केलेल्या प्रयत्नानंतर विद्युत पंप सुरू करून हिवरगाव पठारच्या सुतारवाडी, पायरवाडी व गिऱ्हेवाडी या गावांना योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश आले.

सत्ता असो वा नसो बाळासाहेब थोरात हे आमचे नेते आहे. आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने काम होत असतात आणि होत राहील. मात्र ज्यांना अद्याप हिवरगाव पठार माहित नाही, ज्यांना या वाड्या माहिती नाही ते संगमनेरमध्ये बसून बातम्या देत आहे हे कितपत योग्य आहेत. आमची एक अपेक्षा आहे की तुम्ही नवीन काहीतरी करून दाखवा, नवीन निधी आणून दाखवा, जुने सर्व कामे ही बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केली आहे आणि त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत. – रामदास गोंदके, ग्रामस्थ, गिऱ्हेवाडी.

ज्यांनी अजून आमदारकीची शपथही घेतली नाही ते आमदार आता विकासाच्या बाता मरत आहेत हे अत्यंत चुकीचे आहे. आणि यापुढील काळात अशा चुकीच्या बातम्या देऊन भ्रम करण्याचा प्रयत्न केलाच आम्ही रस्त्यावर उतरून याचा तीव्र निषेध करू. – उपसरपंच दत्तात्रय वनवे

गिर्हेवाडी पायरवाडी व सुतारवाडी येथील आदिवासी नागरिकांकरता हिवरगाव पठारमधून दिल्या जात असलेल्या पाण्याच्या पाईपलाईनचा विद्युत पंप तातडीने सुरू करण्याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन यंत्रणेने मोठा पाठपुरावा केला. याचबरोबर शासकीय अधिकाऱ्यांनी या कामासाठी मदत केली आणि त्यामुळे आम्ही तातडीने या गावांना पाणी देऊ शकलो. – बाळू दुधवडे (पाणी सोडणारे)

आम्ही अगदी डोंगर भागात राहतो. पठार भागात राहतो. आम्हाला अनेक दिवस लाईट नव्हती. ही लाईट, रस्ता पाणी देण्याचे काम आमचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. इथे नवीन कोण आहे हे आम्हाला माहित नाही. आम्ही यापुढेही काहीही लागले तरी बाळासाहेब थोरात यांच्याकडे जाणार. – लक्ष्मीबाई वनवे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,102
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिबिर

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत अचानक निर्माण होणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या…

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.