Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक अहिल्यानगर जिल्ह्यात; शेती व पाणी परिस्थितीचा घेणार आढावा

08/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हिंदूंवरील अत्याचाराविरोधात संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा, आमदार सत्यजित तांबे, नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांची उपस्थिती; प्रांताधिकार्‍यांना दिले निवेदन
आंदोलन

हिंदूंवरील अत्याचाराविरोधात संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा, आमदार सत्यजित तांबे, नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांची उपस्थिती; प्रांताधिकार्‍यांना दिले निवेदन

संगमनेरकरांची मोठी गर्दी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/12/2024Updated:10/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, १० डिसेंबर – संगमनेर

बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अन्याय, अत्याचार होत आहे. हिंदूंची मंदिरे, घरे जाळण्यात, तोडण्यात येत आहे. हिंदू साधूंना तुरुंगात टाकले जात आहे. याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये मंगळवारी सकाळी सकाळ हिंदू समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

यांचा सहभाग – सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेला या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नागरिक पदाधिकारी तसेच संगमनेरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चामध्ये हिंदुत्ववादी संघटना देखील सहभागी झाल्या. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ देखील यावेळी उपस्थित होते.

यांना दिले निवेदन – मंगळवारी सकाळी लाल बहादूर शास्त्री चौकातून निघालेला हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. मोर्चासमोर महानुभव पंथाचे विजय महाराज बाळापुरकर, प्रा. सोपानराव देशमुख यांची भाषणे झाली. दोघांनीही आपल्या भाषणातून बांगलादेशमधील परिस्थिती विशद केली. संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.

अशी आहे बांगलादेशातील परिस्थिती – गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात मोठा हिंसाचार उफाळला आहे. बांगलादेशी हिंदूंवर झालेल्या हल्ल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत नाहीत असा दिवस जात नाही. बांगलादेशात १ कोटी ३१ लाख हिंदूंच्या जीवाला धोका आहे. कधी मंदिरे पाडली जात आहेत, तर कधी पुतळे तोडले जातात, हिंदू प्रतीकांची विटंबना केली जात आहे, निषेध करणाऱ्या हिंदूंच्या हत्या केल्या जातात. अनेक व्हिडिओ असे आहेत जे पाहताही येणार नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये हिंदूंवर क्रूरता कळस गाठत आहे. हल्ले आणि धमक्यांची तीव्रता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या आणि शांततेत पार पडलेल्या या मोर्चाला संगमनेरकरांचा मोठा प्रतिसाद लाभला.

यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त – संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा वेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,518
निषेध मोर्चा बांगलादेश सकल हिंदू समाज
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

By Annant Ppangarkar08/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून आणि आमदार अमोल खताळ…

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक अहिल्यानगर जिल्ह्यात; शेती व पाणी परिस्थितीचा घेणार आढावा

08/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.