Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

June 14, 2026

आज रविवार, १४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 14, 2026

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बाळासाहेब थोरात सभागृहात दिसत नाहीत, नाना तुम्ही तर २०८… आता वास्तव स्वीकारा म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना चिमटे
राजकारण

बाळासाहेब थोरात सभागृहात दिसत नाहीत, नाना तुम्ही तर २०८… आता वास्तव स्वीकारा म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना चिमटे

नार्वेकर यांच्या अभिनंदनावरून सभागृहात टोलेबाजी
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 10, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, १० डिसेंबर – मुंबई 

लोकभावनेची दिशा तुम्हाला कळली असती तर आज ही दशा झाली नसती. लोकांच्या मनात काय ते तुम्हाला कळलेच नाही, परिणामतः बाळासाहेब थोरात आज सभागृहात नाही, नाना पटोले तुम्ही तर २०८… म्हणजे थोडक्यात वाचले, असे चिमटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना काढले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अनुक्रमे एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना शिंदे यांनी लोकांनी तुम्हाला नाकारले आहे हे वास्तव स्वीकारा, असे आवाहन विरोधकांना केले.

काँग्रेसला ८० लाख मते मिळूनही १६ जागा कशा मिळाल्या, असा प्रश्न विरोधक करत आहेत. लोकसभेला आम्हाला ७३ लाख मते पडली; पण जागा सातच आल्या, तेव्हा तुम्हाला ईव्हीएम नाही आठवले का, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

‘रडीचा डाव किती दिवस? आपला करेक्ट कार्यक्रम’… 

लोकसभेला आम्ही कमी पडलो तेव्हा रडत नाही बसलो, तुम्ही विधानसभेला हरलात तर रडीचा डाव खेळत ईव्हीएमला दोष देताय. उगाच स्टंटबाजी करताय, आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे, हे लक्षात घ्या, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत विरोधकांवर केली.

जनतेने दिलेल्या विजयाची टिंगल का करता?

मी २०८ मतांनी निवडून आलो म्हणून माझी टिंगल केली जात आहे. जनतेने मला निवडून दिले आहे. राहुल नार्वेकर यांचे पटोले यांनी अभिनंदन केले. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पटोले यांच्या २०८ च्या मताधिक्यावरून त्यांना चिमटे काढले होते. पटोले त्यावर म्हणाले की, मी किती मतांनी जिंकलो ते महत्त्वाचे नाही. तुम्ही आज जी टिंगल करत आहात ती योग्य नाही. – नाना पटोले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,403
अजित पवार नाना पटोले बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

By अनंत पांगारकरJune 14, 20260

पंतप्रधानपदाचा सर्वाधिक काळ कारभार केल्याच्या कारणास्तव नरेंद्र मोदी यांचा सुरू असलेला उत्सव कमालीचा चर्चेचा बनला…

आज रविवार, १४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 14, 2026

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026

बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 13, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.