Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये शिक्षकाचा ‘शिवपुष्प’ बंगला फोडत ५० ग्रॅम सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लांबवली
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये शिक्षकाचा ‘शिवपुष्प’ बंगला फोडत ५० ग्रॅम सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

शहरालगतच्या गोल्डन सिटीतील घटना
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 11, 2024Updated:December 11, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, ११ डिसेंबर – संगमनेर

संगमनेरमधील उच्चभ्रूची वसाहत समजल्या जाणाऱ्या गोल्डन सिटीतील शिक्षकाचा शिवपुष्प बंगला अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या फोडत ५० ग्रॅम वजनाच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १५ हजार रुपयांची रोकड लांबविण्याची घटना समोर आली आहे. शिक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरात दागिने चोरीच्या तसेच दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडत असताना त्यातच आता दिवसाढवळ्या चोरट्यांनी बंद घरे लक्ष केले असल्याचे समोर येत आहे. दरम्यान या संदर्भात पोलिसांकडून मोठी गुप्तता राखली जात आहे. ७ डिसेंबरला घडलेल्या चोरीच्या दोन घटनादेखील तब्बल तीन दिवसानंतर समोर आल्या आहे.

शिक्षक असलेल्या विलास कारभारी काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी, विलास काळे हे आपल्या पत्नीसह शनिवारी सकाळी ११ वाजता घराचा दरवाजा बंद करून एका विवाह समारंभासाठी पोहेगाव (ता. कोपरगाव) येथे गेले होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ते पुन्हा घरी परतले असता घराचा दरवाजाचा कडी कोयंडा उचकटलेला दिसून आला.

त्यामुळे काळे पती-पत्नीने घरात जाऊन बघितले असता आतील सामान अस्ताव्यस्त पडले होते. तसेच बेडरूममधील कपाटात ठेवलेली १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, पाच ग्रॅम वजनाचे कानातले, ३० ग्रॅम वजनाचे चांदीचे दोन शिक्के व पंधरा हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याचे त्यांना आढळून आले.

शेजारी राहणाऱ्या कानवडे यांच्याकडेही चोरी – दरम्यान विलास काळे यांच्या घराशेजारी राहणाऱ्या भागवत सोमनाथ कानवडे यांच्याकडे देखील दुपारी बारा ते दीड वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने कडी कोयंडा उचकटून रोख रक्कम चोरून नेल्याचे काळे यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार हासे पुढील तपास करत आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,305
गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

By अनंत पांगारकरJuly 25, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: केंद्रातील हुकूमशाही आणि गर्विष्ठ सरकारला देशातील तरुणाईने पुरते नमवले आहे.…

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.