Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवत ७९ गुंतवणूकदारांची साडेसात कोटींची फसवणूक, आरोपी संगमनेर, जुन्नरमधील…
गुन्हेगारी

जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवत ७९ गुंतवणूकदारांची साडेसात कोटींची फसवणूक, आरोपी संगमनेर, जुन्नरमधील…

नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, १५ डिसेंबर

पुणे – बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करून जास्तीचा परतावा देण्याचे अमिष दाखवत ७९ गुंतवणूकदारांची सुमारे साडेसात कोटींची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरून दोघांसह अन्य दोन अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीमध्ये संगमनेरमधील एका आरोपीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

नितीन रावजी शेळके (रा. नारायणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन बाळासाहेब पोखरकर (वय ४१, रा. वारूळवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे), राजेंद्र सूर्यभान उपाध्याय (उपाध्ये) (वय ४२, रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांच्यासह आणखी दोघा अनोळखी व्यक्तींवर नारायणगाव पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नारायणगाव व परिसरातील सुमारे ७९ जणांची पीएलसी अल्टिमा या कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त परतावा देण्याच्या आमिषाने सुमारे ७ कोटी ६७ लाख ९४ हजार ३०० रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे.

नितीन पोखरकर यांनी पीएलसी अल्ट्रा कंपनीत गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त परतावा मिळेल व वर्षाच्या शेवटी गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम मिळेल, अशी माहिती शेळके यांना दिली होती. त्या माहितीवर विश्वास ठेवून शेळके यांनी ४ एप्रिल २०२२ रोजी रोख ५ लाख व ऑनलाईन १० लाख राजेंद्र उपाध्याय यांच्या नावाने संगमनेर जि. अहिल्यानगर येथील एका खाजगी बँकेत श्रीकृष्ण कॅटल अँड पोल्ट्री फीड नावाने असलेल्या खात्यात रक्कम ट्रान्सफर केली. अशी १५ लाखांची गुंतवणूक पीएलसी अल्टिमा नावाच्या मोबाईल ॲपद्वारे डॉलरमध्ये कन्व्हर्ट करून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली आहे.

शेळकेसह नारायणगाव परिसरातील सुमारे ७९ जणांकडून १ डिसेंबर २०२१ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत सुमारे १ लाख ते ५५ लाखांपर्यंतची आर्थिक गुंतवणूक या आरोपींच्या माध्यमातून करण्यात आली. काही दिवसांनी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी पैशांसंदर्भात मागणी केली असता नितीन पोखरकर यांनी गुंतवणुकीचे पैसे देण्यास नकार देऊन शेळके यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,807
फसवणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.