Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सुनेच्या छळाला कंटाळून सासऱ्याची विष पिऊन आत्महत्या
गुन्हेगारी

सुनेच्या छळाला कंटाळून सासऱ्याची विष पिऊन आत्महत्या

राहुरी तालुक्यातील घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/12/2024Updated:16/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार १६ डिसेंबर

सासऱ्याला निवृत्तीनंतर मिळालेले पैसे आपल्या नावावर करावे तसेच एक एकर जमीन आपल्या नावावर करावी, या मागणीसाठी सुनेने आणि तिच्या नातेवाईकांनी खोटा गुन्हा दाखल करत दिलेल्या त्रासाला वैतागून नैराश्य आलेल्या सासऱ्याने विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवण्याचा दुर्दैवी प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे. भाऊसाहेब ब्राम्हणे असे दुर्दैवी सासऱ्याचे नाव आहे.

याबाबत भाऊसाहेब ब्राम्हणे यांची पत्नी लताबाई ब्राम्हणे (रा. चिंचोलीफाटा, ता. राहुरी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपले पती हे ए.डी.सी.सी. बँकेत नोकरीला होते. २०१६ साली ते सेवानिवृत्त झाले. मुलगा विशाल याचा विवाह १३ वर्षांपूर्वी चंद्रकांत ओहोळ (रा. फत्याबाद, ता. श्रीरामपूर) यांची मुलगी वर्षा हिच्याबरोबर झाला. चार-पाच वर्षे सून नीट नांदली. २०१६ ला पती सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांना पैसे मिळाले. तेव्हा सून वर्षा हिने माझ्या नावावर २० लाख रूपये टाका व एक एकर जमीन नावावर करून द्या, असा आग्रह करू लागली.

तेव्हा माझ्या पतीने तिला समजावून सांगितले की, हे पैसे तुमचेच आहे, आता तुला कशाला लागतात ? जेव्हा कशाला लागतील तेव्हा आम्ही तुला देऊ. याचा राग आल्याने तिने घरात शिवीगाळ करत नंतर तिच्या वडिलांना, आमच्या पुतण्याला घरी बोलावून घेतले व सदर पैसे आपल्या नावावर टाकण्यासाठी त्यांना आपल्या पतीला सांगायला लावले. त्यांनाही हे पैसे त्यांचेच आहे, गरज असेल तेव्हा देऊ असे सांगितले. परंतु सून वर्षा हिने त्यानंतरही शिवीगाळ, दमदाटी घरात सुरूच ठेवली. सून, तिचे वडील, पुतण्या तसेच मामा यांनी त्रास देणे चालूच ठेवले. या त्रासाला वैतागून मी व पती आम्ही दोघे राहुरी फॅक्टरी येथे रहायला आलो.

दरम्यान १२ नोव्हेंबरला सून वर्षा हिने वडील चंद्रकांत दादा ओहोळ, पुतण्या सुनील ब्राम्हणे व तिचे मामा राजेंद्र दगडू भोसले यांच्या सांगण्यावरून आपल्याला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा खोटा गुन्हा भाऊसाहेब ब्राम्हणे यांच्यावर दाखल केला. या खोट्या गुन्हयामुळे पती नैराश्यग्रस्त झाले होते. ९ डिसेंबरला ते दुपारी २.३० ला राहुरी कारखाना येथे चौकात जाऊन येतो असे सांगत बाहेर पडले ते परत आलेच नाही.

त्याबद्दल आपण हरवल्याची तक्रारही दाखल केली. १३ डिसेंबरला घोरपडवाडी शिवारात भाऊसाहेब ब्राम्हणे यांचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनात विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यांच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीवरून सून वर्षा विशाल ब्राम्हणे, व्याही चंद्रकांत ओहोळ, पुतण्या सुनील एकनाथ ब्राम्हणे, मामा राजेंद्र दगडू भोसले, यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केल्याचा मजकूर चिठ्ठीत असल्याचे फिर्यादीत म्हटले असून सदर फिर्यादीवरून सून, व्याही, पुतण्या आणि मामा यांच्याविरूद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,240
गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.