Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एकीकडे पंतप्रधान मोदींचा काँग्रेसची घराणेशाही संपविण्याचा संकल्प तर दुसरीकडे संकल्पाला हरताळ फासत राज्यात महायुतीच्या मंत्रिमंडळावर घराणेशाहीचा ठसा!
राजकारण

एकीकडे पंतप्रधान मोदींचा काँग्रेसची घराणेशाही संपविण्याचा संकल्प तर दुसरीकडे संकल्पाला हरताळ फासत राज्यात महायुतीच्या मंत्रिमंडळावर घराणेशाहीचा ठसा!

घराणेशाही संपविण्याचा निर्धार ठरल्या वल्गना!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/12/2024Updated:16/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार १६ डिसेंबर – नागपूर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत काँग्रेसवर हल्लाबोल करताना घराणेशाही मोडून काढण्याचा संकल्प केला होता. दुसरीकडे राज्यात काँग्रेसची वाताहात करणाऱ्या महायुतीने आपल्या मंत्रिमंडळावर घराणेशाहीचा ठसा उमटविला असल्याचे दिसत आहे. ३९ मंत्र्यांच्या यादीत बहुतांश मंत्री घराणेशाहीतून आले असल्याचे दिसते.

रविवारी नागपूरमधील राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात ३९ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह ही संख्या ४२ वर गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारमध्ये चेहऱ्यांना संधी दिली असली तरी मंत्रिमंडळात या मंत्रिमंडळात आपल्याच पंतप्रधान मोदींच्या संकल्पाला तडा देत मंत्रिमंडळात घराणेशाहीतील मंत्र्यांची वर्णी लावली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत मिळूनदेखील मंत्रिमंडळ निवडले जात नव्हते. अखेरीस हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला निवडणूक निकालाच्या २१ दिवसानंतर मंत्रिमंडळाला मुहूर्त लागला. राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या मंत्र्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. नव्या मंत्र्यांना अद्याप भारतीय वाटप करण्यात आले नसले तरी बिन खात्यांच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या या मंत्रिमंडळातील समीकरणावर चर्चा होत असताना दुसरीकडे घराणेशाहीचा ठसा दिसू लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री घराणेशाहीतून आले आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे वडील, काका हे राजकारणातील दिग्गज व्यक्तीमत्त्व राहिले आहेत. त्यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांची मुले पुढे घेऊन जात आहेत.

मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेले इंद्रनील नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांचे चिरंजीव आणि माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे पुतणे आहेत. मेघना बोर्डीकर या माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या आहेत. आकाश फुंडकर हे भाजपच्या सुरुवातीच्या काळातील ज्येष्ठ नेते दिवगंत नेते पांडुरंग फुंडकर यांचे पुत्र आहेत. योगेश कदम हे शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे पुत्र आहेत. नितेश राणे हे शिवसेना-काँग्रेस असा राजकीय प्रवास केलेले भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहे.

याशिवाय अभयसिंहराजे यांचे पुत्र शिवेंद्रसिंह, शिवाजीराव देसाई यांचे पुत्र शंभूराजे देसाई, मोरेश्वर सावे यांचे पुत्र अतुल सावे, बाळासाहेब विखे-पाटील यांचे पुत्र राधाकृष्ण विखे-पाटील, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे-पालवे आणि पुतण्या धनंजय मुंडे यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली.

तर जनसंघाचे दिवगंत नेते गंगाधर फडणवीस यांचे पुत्र आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचे पुतणे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 738
घराणेशाही
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीमुळे देशात आदर्श मॉडेल ठरलेल्या…

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.